कन्नड
Trending

कन्नडला 26 मे रोजी शासन आपल्या दारी, मरगळलेल्या प्रशासनाला मंत्र्यांनी दिला एनर्जीचा बुस्टर डोस !

शासन आपल्या दारी’कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सुक्ष्म नियोजन करा-कृषि मंत्री अब्दुल सत्तार

Story Highlights
  • ‘शासन आपल्या दारी’अभियानाच्या माध्यमातून सर्व विभागांना एकाच छताखाली आणून गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देणे.
  • लाभार्थ्यांना कार्यकमाच्या ठिकाणी घेवून येण्यासाठी गावनिहाय नियोजन करताना व्यवस्थेबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश
  • शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतचा आढावा

संभाजीनगर लाईव्ह, दि. 19 :- सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत औरंगाबाद जिल्हयातील कन्नड येथे येत्या 26 मे रोजी ‘शासन आपल्या दारी’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे नियोजन सुक्ष्म पदधतीने करा, असे आवाहन कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ कार्य्रकमाच्या आयोजनाबाबत कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पी.आर.देशमुख आदी उपस्थित होते.

कृषि मंत्री सत्तार म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक विभागाने लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी नियोजन करावे. मराठवाडयासह राज्यात या कार्यकमाच्या यशस्वी आयोजनाचा पॅटर्न निर्माण करावयाचा आहे.त्यासाठी प्रत्येक विभागाने थेट लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी गाव, योजना व लाभार्थीनिहाय नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

‘शासन आपल्या दारी’अभियानाबाबत नियोजन करताना गावातील लाभार्थी, सरपंच व प्रशासकीय यंत्रणेत ग्रामसेवक, तलाठी व कृषि सहायक यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करावे. अभियानांतर्गत अधिकाधिक लाभार्थ्यांना एकाच दिवशी शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन कृषि मंत्री सत्तार यांनी केले.

‘शासन आपल्या दारी’अभियानाच्या माध्यमातून सर्व विभागांना एकाच छताखाली आणून गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देणे या उपक्रमाद्वारे साध्य होणार आहे. या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तत्काळ निराकरण करणे शक्य होणार आहे. लाभार्थ्यांना कार्यकमाच्या ठिकाणी घेवून येण्यासाठी गावनिहाय नियोजन करताना व्यवस्थेबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनीही कार्य्रकमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाचे नियोजन सादर केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!