छत्रपती संभाजीनगर
Trending

औरंगाबादेतील हॉटेल रामा इंटरनॅशनल परिसरात दहशतवादी हल्याची रंगीत तालीम ! NSG च्या ११२ जवानांनी मिळवले परिस्थीतीवर नियंत्रण !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ –  देशातील वाढत्या दहशतवादी कारवाया व दहशतवादी हल्याच्या वेळी करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने औरंगाबाद शहरातील हॉटेल रामा इंटरनॅशनल जेथे विदेशी पर्यटक येत असतात. अशा ठिकाणी बॉम्बस्फोट व अतिरेकी अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) यांचे वतीने दि. १९/०५/२०२३ रोजी दहशतवादी हल्याची रंगीत तालीम घेण्यात आली.

दिनांक १९/०५/२०२३ रोजी १०.०० वाजता नियंत्रण कक्ष येथे फोनवरून माहिती प्राप्त झाली की, हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे समोरील लॉनवर बॉम्बस्फोट झाला असून काही अतिरेकी घुसले आहेत. त्यानंतर नियंत्रण कक्षातून सदर माहिती वरिष्ठांना दिली. अपर्णा गिते, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांनी नियंत्रण कक्षातून जलद प्रतिसाद पथक (QRT), दंगा काबु पथक ( RCP), बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि मनुष्यबळ व वरीष्ठ अधिकारी यांना रवाना करण्याबाबत सूचना दिल्या.

त्यानंतर वरूण वाहन, अग्निशमन वाहन, अॅम्ब्युलन्स इत्यादी वाहने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी कर्नल क्रिपालसिंग, ग्रुप कमांडर यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (NSG) ११२ जवान यांनी परिस्थीतीवर नियंत्रण मिळवले. सदरची रंगीत तालीम १०.०० वाजता सूरू होवून १३.१५ वाजता संपविण्यात आली.

सदर अतिरेकी हल्याच्या रंगीत तालीमच्या वेळी मनोज लोहिया, पोलीस आयुक्त, अपर्णा गिते, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), शिलवंत नांदेडकर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२,  बालाजी सोनटक्के, सहायक पोलीस आयुक्त (विशेष शाखा),  संभाजी पवार, पोलीस निरीक्षक पो.स्टे. सिडको, संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे व अंमलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!