छत्रपती संभाजीनगरसिल्लोड
Trending

सिल्लोडच्या शेतकऱ्यावर बेगमपुऱ्यात चाकू हल्ला, दोघांनी पकडले अन् दोघांनी चाकूचे वार केले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – डेयरीवरून दुध घेऊन परतत असताना शेतकर्यावर सात जणांनी हल्ला चढवला. दोघांनी पकडले आणि दोघांनी चाकुहल्ला केल्याची घटना रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान छोटी मशिद, जयसिंगपुरा, बेगमपुरा परिसरात घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरु आहेत.

कैफखाँ फेरोजखाँ, फेरोजखाँ महेबुबखाँ, मोईन महेबुब वकील व अक्रमखान महेबुबखान, शेहबाज खान अक्रम खान, फईम खान शेख नईम खान, शेख असीम शेख नईम (सर्व रा. जयसिंगपुरा, औरंगाबाद) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोलुखान नवाबखान पठाण (वय46 वर्षे, धंदा शेती रा तांडाबाजार ता सिल्लोड जि औरंगाबाद ह.मु. जयसिंगपुरा बडी मज्जिद चे पाठीमागे औरंगाबाद) असे जखमीचे नाव आहे. भोलुखान हे त्यांच्या जावयाकडे जयसिंगपुरा येथे सध्या वास्तव्यास आहे.

भोलुखान नवाबखान पठाण घाटीत वार्ड क्र. ११ मध्ये दाखल असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेसंदर्भात भोलुखान नवाबखान पठाण यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, सुमारे पाच सहा दिवसांपासून जायसिंगपुरा येथे राहणारे सावत्र भाऊ व भाचे यांचेसोबत मुलीला देत असलेल्या त्रासावरुन आपसात वाद चालु आहे. याबाबत पोलीस स्टेशनला चार वेळेस n. c दाखल केली आहे.

दिनांक. 21/02/2023 रोजी रात्री 09.30 वाजेच्या सुमारास भोलुखान नवाबखान पठाण जयसिंगपुरा येथील डेअरीवरून दुध घेऊन घरी जात होते. छोटी मशिद जयसिंगपुरा येथे त्यांना कैफखाँ फेरोजखाँ व फेरोजखाँ महेबुबखाँ यांनी भोलुखान नवाबखान पठाण यांना पकडले. ते म्हणाले की आता कशी तक्रार करतो असे म्हणून दोघांनी हातपाय पकडले.

त्यानंतर मोईन महेबुब वकील व अक्रमखान महेबुबखान या दोघांनी भोलुखान नवाबखान पठाण यांच्या पायाच्या दोन्ही पोटरीवर चाकुने वार करून मला जखमी केले. त्यानंतर शेहबाज खान अक्रम खान, फईम खान शेख नईम खान, शेख असीम शेख नईम यांनी काठ्याने मारुन जखमी केले. त्यावेळी तेथे राहणारे नासेर खान याने भोलुखान नवाबखान पठाण यांना घाटीत दाखल केले.

भोलुखान नवाबखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैफखाँ फेरोजखाँ, फेरोजखाँ महेबुबखाँ, मोईन महेबुब वकील व अक्रमखान महेबुबखान, शेहबाज खान अक्रम खान, फईम खान शेख नईम खान, शेख असीम शेख नईम या सात जणांवर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि घुगे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!