रेल्वेचा पुन्हा भीषण अपघात: पश्चिम बंगालमध्ये दोन मालगाड्यांची धडक ! १२ डबे रुळावरून घसरले, अनेक गाड्या रद्द !!
कोलकाता, दि. २५ – ओडिशा राज्यात नुकत्याच झालेल्या तिहेरी रेल्वेचा अपघात ताजा असतानाच आता पुन्हा पश्चिम बंगालच्या बांकुरा येथे दोन मालगाड्यांची भीषण धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की मागच्या ट्रेनचे इंजिन समोरच्या मालगाडीवर चढले. या दोन्हीही मालगाड्या रिकाम्या होत्या. रविवारी पहाटे साखर झोपेत ही घटना घडली.
या अपघातात प्राथमिक माहितीनुसार 12 डबे रुळावरून घसरले आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णत विस्कळीत झाली असून गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालच्या बांकुरामध्ये मोठा अपघात झाला आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर आद्रा विभागांतर्गत बांकुरा येथे दोन मालगाडीच्या धडकेमुळे या विभागातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
ओंडा स्थानकाजवळ मालगाडीने उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. ही धडक जोरदार होती. इंजिन पार्क केलेल्या रेल्वेवर चढले. या अपघातात चालक जखमी झाला. काही दिवसांपूर्वी ओडिशा राज्यातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या आठवणींना उजाळा मिळाला.
पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडलेल्या या भीषण घटनेमुळे आद्रा-खडगपूर मार्गावर गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बांकुराहून येणारी दुसरी मालगाडी ओडा रेल्वे स्थानकाजवळील लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. यामुळे खडगपूर-बांकुरा-आद्रा मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. आद्रा विभागातील ओंडग्राम स्थानकावर मालगाडी रुळावरून घसरल्याने 14 गाड्या रद्द केल्या असून 3 रेल्वे अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe