छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

हर्सूल सावंगी रोडवरील नायरा पेट्रोलपंपाजवळ अपघातात कोलठाणवाडीचा शेतकरी जखमी, धडक देवून गाडीचालक पसार !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ : शेतकर्याला पाठीमागून धडक दिल्याने डोक्याला मार लागून शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना हर्सूल परिसरात घडली. ही घटना सावंगी-हर्सूल रोडवरील नायरा पेट्रोलपंपाजवळ घडली. शेतकरी सावंगीकडून हर्सूलकडे निघाले असता एका पांढर्या रंगाच्या गाडीने धडक देवून सदर गाडीचालक घटनास्थळावरून पसार झाला.

चदांसिंग धन्नासिंग गिल (वय 45 वर्षे धंदा शेती रा. कोलठाणवाडी ता.जि.छत्रपती संभाजीनगर) असे जखमी शेतकर्याचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी चदांसिंग धन्नासिंग गिल हे रोडच्या कडेला रिक्षाची वाट बघत असताना यातील अज्ञात चार चाकी वाहन पांढ-या रंगाची जिचा क्र.MH 14 KQ 3808 चालकाने भरधाव निष्काळजीपणाने गाडी चालवून  फिर्यादी गिल यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात फिर्यादी गिल हे गंभीर जखमी होवून त्यांच्या डोक्याला मार लागला. अपघाताची खबर न देताच गाडीचालक पसार झाला.

याप्रकरणी जखमी चदांसिंग धन्नासिंग गिल (वय 45 वर्षे धंदा शेती रा. कोलठणवाड़ी ता.जि.छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाडी क्रमांक .MH 14 KQ 3808 च्या चालकावर हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!