छत्रपती संभाजीनगर
Trending

नायलॉन मांजा विक्री केल्यास दुकानदारांवर होणार कायदेशीर कारवाई ! पैठण, फुलंब्री, कन्नड, वैजापूरसह जिल्ह्यातील सर्व २३ ठाण्यातील पोलिसांच्या या मोबाईवर द्या गोपनीय माहिती !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – मानवी व प्राणी जीवितास अपायकारक असलेला नायलॉन / प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी / विक्री करणार्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस स्टेशनमध्ये या पथकाची स्थापना केली असून प्रमुखांचा मोबाईल नंबर दिला आहे. या मोबाईलवर माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून नायलॉन मांज्याची विक्री करणार्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी दिली.

पोलिस अधिक्षक मनीष कलवानीया यांनी अवाहन केले आहे की, नायलॉन / सिंथेटीक धाग्यापासून बनविलेल्या मांजामुळे मानवी व प्राणी जीवितास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे. अशा प्रकारे मानवी व प्राणी जीवितास अपायकारक असलेला नायलॉन / प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी / विक्री करणारे साठा करणारे दुकानदार त्यांची निर्मीती अथवा पुरवठा करणार्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हयातील सर्व २३ पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यांत आली आहे.

या मांज्याची विक्री करणार्यांची माहिती असल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास ११२ या क्रमांकावर तसेच खालील नमुद पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून द्यावी, माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नांव गोपनीय ठेवण्यांत येईल, असे जिल्हा पोलिस अधिक्षक मनीष कलवानीया यांनी कळवले आहे.

१) पोलीस ठाणे पैठण – पोलीस निरीक्षक किशोर पवार मो.नं. ९८२३८८७६९९

२) पोलीस ठाणे एम. पैठण सहा. पोलीस निरीक्षक नागरगोजे मो.नं.८९९९३११९४७

 ३) पोलीस ठाणे बिडकीन :- सहा. पोलीस निरीक्षक संतोष माने मो.नं. ७०२०९२०३२४

४) पोलीस ठाणे पाचोड:- सहा. पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे मो.नं. ९४०४६६३२३४

 ५) पोलीस ठाणे करमाड- पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले मो.नं. ९८५०९०९५५५

६) पोलीस ठाणे चिकलठाणा:- पोलीस निरीक्षक देविदास गात मो.नं.८४६८९२२२७८

७) पोलीस ठाणे फुलंब्री- पोलीस निरीक्षक निकाळजे मो.नं.८९७५७६२९०६

८) पोलीस ठाणे वडोदबाजार:-  सहा. पोलीस निरीक्षक आरती जाधव मो.नं. ९८१०८४९०१८

९) पोलीस ठाणे सिल्लोड शहर :- पोलीस निरीक्षक मुदीराज मो.नं. ९९२३४५८५७९

१०) पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण :- पोलीस निरीक्षक सिध्दराम मेहेत्रे मो.नं. ९८२३६०७७९९

११) पोलीस ठाणे अजिंठा – सहा. पोलीस निरीक्षक अजित विसपुते मो.नं. ९९६७१४१०३१

१२) पोलीस ठाणे फर्दापुर:- सहा. पोलीस निरीक्षक वाघमोडे मो.नं.८८८८८१००४२

१३) पोलीस ठाणे सोयगांव :- सहा. पोलीस निरीक्षक अनमोल केदार मो.नं. ९७०२०९९१००

१४) पोलीस ठाणे पिशोर:- सहा. पोलीस निरीक्षक कोमल शिंदे मो.नं. ९६८९०६६२८९

१५) पोलीस ठाणे कन्नड शहर- पोलीस निरीक्षक राजीव तळेकर मो.नं. ९८२३४९८७७७

१६) पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण- सहा. पोलीस निरीक्षक भालेराव मो.नं. ९००४३३५३३३

१७) पोलीस ठाणे खुल्ताबाद :- पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे मो.नं.८८०५९९८८१४

१८) पोलीस ठाणे देवगांव रंगारी- सहा. पोलीस निरीक्षक अमोल मोरे मो.नं. ९९२३६९३८२३

१९) पोलीस ठाणे शिऊर:- सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील मो.नं.७५८८०५२०६१

२०) पोलीस ठाणे वैजापूर- पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत मो.नं. ९०११०६१७७७

२१) पोलीस ठाणे विरगांव- सहा. पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे मो.नं. ९७६५१३७६५२

२२) पोलीस ठाणे गंगापूर:- सहा. पोलीस निरीक्षक चौरे मो.नं. ९९२२०३८११५

२३) पोलीस ठाणे शिल्लेगांव:- पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे मो.नं. ७०२०५३२६४०

पर्यावरणास अपायकारक असलेल्या कोणत्याही नायलॉन मांजाची विक्री, पुरवठा, वाहतूक करू नये असे आढळून आल्यास संबंधीत दुकानदार व पुरवठादार यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यांत येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!