महाराष्ट्रराजकारण
Trending

अजित पवार गटातील आमदार नाराज ! भाजपा, शिंदे गटाकडील खात्यांकडून कमी निधी मिळत असल्याची चर्चा !!

मुंबई, दि. १३ – उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडे असलेल्या खात्यांकडून कमी निधी मिळत असल्याच्या तक्रारी अजित पवार गटाच्या असल्याचे सूत्रांकडून समजते.

एकच वादा अजित दादा म्हणून राजकारणात सुपरिचित आहे. पहाटेच्या शपथविधीचा अनुभव असलेल्या महाराष्ट्राला अजितदादांनी भर दुपारीही धक्का दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामिल महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली होती. शिवसेनेत ज्या पद्धतीने उभी फूट पडली होती अगदी त्यांचे अनुकरण करत अजित पवार गटानेही ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धक्का देत राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. विकासासाठी आम्ही सत्तेस सहभागी झालो अशी महाराष्ट्राला न पटणारी थाप अजित पवार गटाकडून मारण्यात आली खरी मात्र सत्तेत सहभागी झाल्यानंतर अगदीच काही दिवसांनी अजित पवार गटातील आमदारांनी कमी निधी मिळत असल्याचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे.

ज्या शिंदे गटाने उठाव करून महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपा सोबत हातमिळवणी केली होती त्या शिंदे गटांच्या आमदारांनी त्यावेळी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी निधी देतात असा आरोप शिंदे गटाने केला होता. आता आगदी तसाच आरोप होत आहे परंतू यावेळचं चित्र थोडं उलटं आहे. ते म्हणजे आता अजित पवार गटाचे आमदार कमी निधी मिळत असल्याचे खाजगीत बोलत आहेत. भाजपा शिंदे गटाकडे असलेल्या खात्यांकडून तुलनेने अजित पवार गटाच्या आमदारांना कमी निधी मिळत असल्याची चर्चा आहे.

एकंदरीतच राजकारणात काहीही होवू शकतं याचा प्रत्येय महाराष्ट्राने यापूर्वीच दाखवलेला आहे. भिन्न विचारसरणीचे पक्ष सत्तेसाठी एकत्र येवू शकतात, हे महाराष्ट्राने अनुभवलेले आहे. याचिशिवाय राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष असे आहेत की ते अर्धे सत्तेत आहेत आणि अर्धे विरोधात आहेत, असा अनुभव राजकारणात कदाचित पहिल्यांदाच आला असावा. त्यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पाहूया आता अजित पवार गटांचे आमदार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेमका कोणता सूर आळवून कोणती भूमीका घेतात ?

Back to top button
error: Content is protected !!