पालकमंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे व आमदार हरिभाऊ बागडेंचे फोटो असलेले बॅनर जाळले ! पैठण तालुक्यातील तोंडुळी गावात मराठा आरक्षण मागणीचा भडका, सहा मराठा युवकांवर बिडकीन पोलिसांत गुन्हा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – मराठा आरक्षणावरून राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असून गावांगावांतील युवकांमधून लोकप्रतिनीधी व सरकारवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गाने लाखोंचे मोर्चे काढणार्या मराठा समाजाची देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने दखल घेतली. मात्र, अजूनही राज्यकर्ते टिकणारं आरक्षण देत नसल्याने संताप वाढत असून युवक आता आक्रमक भूमीका घेताना दिसत आहे. अशीच घटना पैठण तालुक्यातील तोंडुळी गावात घडली. येथील मराठा युवकांनी मंत्री संदिपान भुमरे, अतुल सावे व आमदार हरिभाऊ बागडे यांची प्रतिमा असलेले बॅनर जाळले. नेत्यांच्या दबावामुळे सहा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१) अमोल जाधव, 2) कृष्णा आगळे, 3) उमेश गरड, 4) विक्रम जाधव व इतर दोन (रा तोंडुळी ता पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) या युवकांवर बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार (प्रथम माहिती अहवालानुसार), लोहगाव येथिल आर. बि. वॉटर पार्कचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या तसेच मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन असल्याने दि 22/10/2023 रोजी दुपारी 12.00 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिवाजीराव सुरवसे (पोलिस ठाणे बिडकिन), पोउपनी क्षीरसागर, सहय्यक उपनिरिक्षक तांगडे पोहेका कदम आदी बंदोबस्तावर होते.
दरम्यान, पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तोडुळी ते लोहगाव या सार्वजनिक रोडवर तोडुळी गावातील चौकातील रोडवर मराठा समाजाच्या युवकातर्फे बेकायदेशीर जमाव जमवून सकल मराठा समाजास जो पर्यत सरकार आरक्षण देणार नाही तो पर्यत कोणत्याही पक्षाचे आमदार, खासदार नेते यांचे फोटो असलेले बॅनर फ्लेक्स गावात लावू देणार नाही, असा निषेध म्हणून तोंडुळी गावातील चौकात पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा तसेच मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे यांचे फोटो असलेला बॅनर फेल्क्सचे दहन करणार असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे व पोउपनी क्षीरसागर सहय्यक उपनिरिक्षक तांगडे पोहेका कदम, साळवे, पोना बनगे, नाडे आदी पोलिस पथक शासकीय वाहनाने तोंडुळी गावातील चौकात पोहचले. तेव्हा तेथे मराठा समाजाचे कार्यकर्ते १) अमोल जाधव, 2) कृष्णा आगळे, 3) उमेश गरड, 4) विक्रम जाधव व इतर दोन (रा तोंडुळी ता पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) हे जो पर्यत मराठा आरक्षण नाही तो पर्यंत कोणत्याही प्रकारच मतदान करणार नाही असे म्हणून रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा तसेच मंत्री अतुल सावे हरिभाऊ बागडे यांचे फोटो असलेला बॅनर फ्लेक्स दुपारी 12.30 ते 13.00 वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळला.
पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला. परंतु त्यांनी फेल्क्सचे दहन केले. संध्या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हयात जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश दि 18/10/2023 अन्वये लागू करण्यात आलेले आहे. जमावबंदी काळात जमाव जमवून आदेशाचा भंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिसांत सहा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे मराठा समाजातून लोकप्रतिधींवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनधी तथा राज्यकर्ते हे टिकणारं आरक्षण देण्यास विलंब करत असून दुसरीकडे युवकांवर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करत असल्याने राज्यसरकारवर असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe