महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळून सुनावलं ! या वयात दंगली भडकावण्याची भाषा करता ? तंगडे तोडा अन् हातं तोडा ? ये बरं तंगडं तोडायला, मी जातीसाठी तंगड तोडून घ्यायला तयार आहे, ये !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्याच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला असून मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनीही त्यांना जशाच तशा भाषेत उत्तर दिलं आहे. अलिकडच्या काळात जरांगे आणि भुजबळ यांच्यात वाकयुद्ध सुरु असून आज मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळून चांगलच सुनावलं. या वयात दंगली भडकावण्याची भाषा करता. तंगडे तोडा अन् हातं तोडा. ये बरं तंगडं तोडायला. मी जातीसाठी तंगड तोडून घ्यायला तयार आहे. ये, अशा कडक शब्दात जरांगे पाटलांनी भुजबळ यांचा खरपूस समाचार घेतला.

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आता नाव नाही घ्यायचं ठरलं म्हटल्यावर. तसच कराव लागणार ना. त्यांनी आपलं नाव घेतलं की आपण घेतलंच म्हणून समजायचं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले की सुट्टीच नाही. ते सांगायचंच नाही. इतके अन् तितके. चार पाच गेले तुम्ही असं वागायला लागला म्हणून. जातीवाचक, जातीय दंगली व्हत्यात म्हणून तुमच्याकडून चार पाच जण गेलेत.

तुमच्याकडून कोणी राहीना. जरा डोक्यात उजेड पाडून घ्या साहेब. जुनाट नेत आहात आपण अनुभव आहे आपणाकडं. तुम्ही जरा शहाणपणाची भूमीका घ्या. तुमच्या मांडीला मांडी लावून बसायलासुद्धा ओबीसीचे नेते आता नको म्हणायला लागलेत. ते म्हणतात हे कुणकडं बराळाला लागलेय. नसल्याला गुंतवून टाकीन आपल्यालाबी. व्हा जरा हुश्शार. म्हणतात महे केसं पिकले. कशाला पिकलं केसं ? त्यांना काय राग आलाय का जुनाट म्हटल्याचा ? माझे केसं मी ईतके केले अन् डोक्यावरून हात फिरवतात. अन् एकही केस नाही टकुर्याला. पांढर्या केसाचा काही उपयोग झाला का ?

जाती जातीत दंगली निर्माण करायला लागला या वयात. जाती जातीत तेढ निर्माण करायला लागलात या वयात. आणि सरकारही त्यांच्या दबावात यायला लागलं. काय दबावात यायचा संबंध आहे यांच्या ? कशामुळं तुम्ही त्यांचंच ऐकताहेत ? हमेशा तुम्ही त्या ओबीसी नेत्याचच ऐकता. काय संबंध आहे. सरकारने त्यांचं ऐकून गोर गरिब मराठ्यांवर अन्याय करू नये. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. काय कशामुळे दबाव आहे ? खूप दिवस खाल्लंय आता. या वयात ते दंगली भडकावण्याची भाषा करत आहेत. तंगडे तोडा अन् हातं तोडा. ये बरं तंगडं तोडायला. मी जातीसाठी तंगड तोडून घ्यायला तयार आहे. ये, अशा कडक शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचा नोमोल्लेख टाळून सुनावलं.

Back to top button
error: Content is protected !!