मंत्री गिरीष महाजन यांनी मराठा आरक्षणावर चुकीचं स्टेटमेंट करू नये अन्यथा त्यांच्या आश्वासनाच्या रेकॉर्डिंग पुऱ्या राज्यात व्हायरल करू: मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – मंत्री गिरीष महाजन यांनी वेगवेगळी विधाने करू नये आणि मराठा समाजाला नडन्याचं काम करू नये. त्यांच्या सर्व रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. त्या सर्व रेकॉर्डिंग पुऱ्या राज्यात व्हायरल करू, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं हे कदापी शक्य नाही, या ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील प्रसारमाध्यमांना म्हणाले की, त्यांनीच (मंत्री गिरीष महाजान) सांगितलं होतं की, एक महिन्यांचा वेळ द्या. नोंदीचा अहवाल बनवु. कायदा पारित करतो. हा त्यांचा शब्द आहे.
त्यांनी (मंत्री गिरीष महाजान) वेगवेगळी विधाने करू नये आणि मराठा समाजाला नडन्याचं काम त्यांनी करू नये. चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये. कारण त्यांच्या सर्व रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. शुटींगसुध्दा आहेत मीडियावरती. पुऱ्या राज्यात व्हायरल करू. कारण इतक्या मोठ्या उंचिच्या नेत्यानं भरकटल्यासारखं वक्तव्य करायचं नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील आज खान्देश दौर्यावर आहेत. त्यानंतर ते विदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात जागृती करणार आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe