महाराष्ट्र

२५ वर्षीय विवाहितेवर जंगलात सलग ३ दिवस लैंगिक अत्याचार!, अमरावती हादरले

अमरावती, दि. १५ ः मजुरीसाठी जाणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेला रस्त्यात अडवून तोंड दाबून जंगलात नेत हातपाय बांधून लैंगिक अत्‍याचार केल्याची खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यात समोर आली आहे. सलग ३ दिवस नराधमाने तिचे लचके तोडले. १३ डिसेंबरला विवाहितेने या प्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ३० वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत हे अत्याचारसत्र घडले.

हिरालाल साबूलाल जामूनकर (रा. खडीमल) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तक्रारीनुसार, विवाहिता ९ डिसेंबरला दुपारी एकच्या सुमारास मजुरीसाठी जात होती. रस्त्यात तिला हिरालालने अडवले. रस्त्यावर कुणी नसल्याचे पाहून तोंड दाबून तिला ओढत जंगलात नेले. तिच्याच साडीने तिचे हातपाय, तोंड बांधले. रात्र झाल्यानंतर त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध बनवले.

तीन दिवसांत दोन ते तीनवेळा त्याने जबरदस्ती केल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. १३ डिसेंबरला रात्री तिने स्वतःची सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हिरालालच्या शोधात पथक रवाना केले. मात्र तो घरी मिळून आला नाही. त्याचा शोध घेतला जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!