राजकारण
Trending

छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट: कायदे तज्ञांसोबत चर्चा करूनच निर्णय घेतला ! सरकारमध्ये सामिल होण्याअगोदर आमदारांच्या सह्या घेतल्या !!

मुंबई, दि. ६ – वर्षापूर्वी चांगल घडलं होतं. (शिंदेसेनेच्या आमदारांना) ट्रिप घडली होती. ते आता घडल नाही, अशी मिश्किल टिप्पनी करून छगन भुजबळांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटाने सत्तेत सामिल होण्यामागचे अनेक गोप्यस्फोट केले. वर्षभरापूर्वी (शिवसेनेसंदर्भात) निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने आपल्या निकालात केलेली या प्रकरणाची उकल याचा सविस्तर आभ्यास कायदे तज्ञांनी केला आहे. या कायदे तज्ञांशी चर्चा करूनच आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सामिल झालो. तत्पूर्वी सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या असून ही कागदपत्रे सादर करण्यात आली असल्याचा गौप्यस्फोटही छगन भुजबळ यांनी केला. आज, ६ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

गेल्या महिन्यात अनेक बैठका- शेवटपर्यंत काही मार्ग निघतो का यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. सुप्रियाताई सुळेही तेथे उपस्थित होत्या. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्याशी यापूर्वी दोन वेळा चर्चा झाली. काही मार्ग निघतो का हे पाहिले. मात्र मार्ग न निघल्याने आम्ही पुढं गेलो. शेपटपर्यंत प्रयत्न केला. गेल्या महिन्यात अनेक बैठका झाल्या. मात्र, काहीही निर्णय न झाल्याने आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे सरकलो.

अजित पवार आमचे अध्यक्ष- अजित पवार हे आमचे अध्यक्ष राहतील याचा पुनरुच्चार करत भुजबळ म्हणाले की, हे खरं आहे, आम्ही सरकारमध्ये सामिल होण्याच्या अगोदर ज्या काही कागदावर सह्या करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत. ती कागदे सादरही केली आहेत. काल सगळ्याच गोष्टीची उकल अजित पवारांनी आपल्या भाषणात केली. एक प्रकारे पाढाच त्यांनी वाचून दाखवला. मी ही काही गोष्टी सांगितल्या. परंतू सातत्याने आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असेही भुजबळ म्हणाले.

नाव न घेता शरद पवारांवर साधला निशाणा – एकदा झालं.. दोनदा झालं… सातत्त्याने जर असं होत असेल तर पक्षात राग येणं सहाजिकच आहे. सातत्यानं या गोष्टी घडत गेल्या. हा सर्व पाढा अजित दादांनी काल आपल्या भाषणात मांडला, असा नाव न घेता भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. आपण पाहिलं आषाढी एकादशीला… अगदी त्याच पद्धतीने दोन चार लोकच जे आहे, ते सांगताहेत त्यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होत आहे. सूचना करूनही काहीच होत नाही, असा गौप्यस्फोटही भुजबळ यांनी केला. अजित पवारांनी चर्चा केली नंतर मी चर्चा केली तरीही काहीही फरक पडला नाही. म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांनी जर मला सांगितले तर मी थांबेन, हे सांगायलाही भुजबळ विसरले नाही.

Back to top button
error: Content is protected !!