छत्रपती संभाजीनगर
Trending

सर्व महाविद्यालये व विद्यापीठातील पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी सोमवार अखेरचा दिवस ! ज्या विभागात जागा रिक्त असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.१९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर विभागात प्रवेश घेण्यासाठी सोवार, दि.२१ हा अखेरचा दिवस आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर विभागात प्रवेशासाठी २१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ज्या विभागात जागा रिक्त असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

मुख्य परिसरातील मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच आंतरविद्याशाखेळीत प्रवेश प्रक्रिया होती. पहिल्या तीन टप्प्यांत विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविद्या, आंतरविद्या, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेतील तसेच व्यायवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन प्रवेश फेरीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. तिनही फेरी झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १८ ते ३१ जुलै या दरम्यान स्पॉट ॲडमिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पॉट अ‍ॅडमिशनच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले.

रिक्त जागांवर ‘फर्स्ट कम फर्स्ट अ‍ॅडमिशन बेसिस’वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्युत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान विद्यापीठातील विविध विभागातुन रिक्त असलेल्या जागांवर येत्या २१ ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणारे शिक्षण देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

देशातील सर्वाधिक संशोधक घडविणा-या आपल्या विद्यापीठात अत्यंत अन्य खर्चात शिक्षण, वसतिगृह या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही ते म्हणाले. अत्यंत सर्व सामान्य घरातील पदवीधर विद्यार्थी आपल्या विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांना अत्यंत अल्पदरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. कमवा व शिका योजनेतंर्गत मानधनही वाढविण्यात आले आहे. नवीन विद्यार्थ्यांने विद्यापीठात स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!