टॉप न्यूजवैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील शिऊर शिवारात मोटारसायकल अपघातात चिकटगावचा शेतकरी ठार ! मोटारसायकलला जोराची धडक देवून पिकअप पसार !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – वैजापूर तालुक्यातील शिऊर शिवारात मोटारसायकल अपघातात चिकटगावचा शेतकरी ठार झाला तर त्याची पत्नी जखमी. मोटारसायकलला जोराची धडक देवून पिकअप पसार झाला. ही घटना शिऊर शिवारात जुना पेंढेफळ रोडजवळ घडली.

बाबासाहेब नामदेव निकम (वय 60 वर्षे) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लताबाई बाबासाहेब निकम (वय 55 वर्ष व्यवसाय शेती रा. चिकटगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. यासंदर्भात लताबाई निकम यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून दिनांक 26/07/2024 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शिऊर येथे कार्यक्रम असल्याने लताबाई बाबासाहेब निकम व त्यांचे पती बाबासाहेब हे मोटार सायकलने (क्रमांक MH 20 CZ 5969) निमगाव मार्गे शिऊरकडे जात होते.

शिऊर शिवारात जुना पेंढेफळ रोडजवळ त्यांच्या मोटारसायकलच्या पाठीमागून येणाऱ्या अज्ञात पिकअप गाडीने जोराची धडक दिली. दोघे पती पत्नी मोटरसायक सह खाली पडले. त्यामध्ये बाबासाहेब निकम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व लताबाई बाबासाहेब निकम यांच्या डोक्याला व कंबराला मार लागला. पिकअप चालकाने वाहन न थांबता घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर लोकांनी दोघा पती पत्नीला जखमी अवस्थेत सरकारी दवाखाना शिऊर येथे दाखल केले. जखमीचे नातेवाईक सरकारी दवाखाना शिऊर येथे पोहोचले. त्यांनी जखमी दोघांना अधिक उपचार कामी सरकारी दवाखाना वैजापूर येथे दाखल केले.

तेथे डॉक्टरांनी बाबासाहेब निकम यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. त्यांनतर शिऊर पोलिसांनी पंचनामा केला व वैद्रद्यकिय अधिकारी यांनी पोस्टमार्टम केले. त्यानंतर मृतदेह अत्यंविधीसाठी चिकटगाव येथे घेवून गेले. दरम्यान, लताबाई बाबासाहेब निकम यांना डोक्याला व कंबरेला जास्त मार लागल्याने संजिवनी हॉस्पिटल वैजापूर येथे दाखल केले.

Back to top button
error: Content is protected !!