लिव्ह इन पार्टनर महिलेचे इलेक्ट्रिक करवतीने तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवलं मांस ! मिक्सरमध्ये बारीक करून तुकड्यांची लावली विल्हेवाट, निर्घृण खूनाने महाराष्ट्र हादरला !!
मुंबई, दि. ८ – महिलेचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केल्याची खळबळजनक घटना मुंबई जवळील मीरा रोड नयानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत आकाशदीप बिल्डिंगमध्ये समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इलेक्ट्रिक करवतीने महिलेच्या शरीराचे तुकडे करून नंतर कुकरमध्ये ते मासाचे तुकडे शिजवून त्याची विल्हेवाट लावली. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवून पोलिसांना बोलावले व त्यानंतर या निर्घृण खूनाचा उलगडा झाला. मृत महिला आणि आरोपी हे लिव्ह इन मध्ये राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. खूनाचे कारण अद्याप कळले नसून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आहेत.
सरस्वती वैद्य असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मनोज साने याच्यावर मीरा-भाईदर जिल्ह्यातील नयानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता १६ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलिस उपनिरीक्षक राहुल बाळासाहेब भागतव (नयानगर पोलीस ठाणे) यांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, सुमारे 19.00 वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलीस निरीक्षक (गुन्हे व प्रशा) जिलानी सय्यद यांना कळविले की, गितानगर फेज 7 मधील गिता आकाशदिप जे विंग 7 व्या माळयावरील फलट नं. 704 मधून दुर्गंधी येत आहे तरी तुम्ही जाऊन काय प्रकार आहे ते पहा. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक राहुल बाळासाहेब भागतव सोबत पो.नि. जिलानी सय्यद खाजगी वाहनाने सदर ठिकाणी पोहचले.
तेथे गिता आकाशदीप बिल्डींग जे विंग बाबत वाचमन यांना विचारपुस करून 7 व्या माळ्यावर पोहचले. फलट क्रं. 704 मधुन दुर्गंधी येत होती. याच बिल्डिंगमधील रहिवासी यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, फ्लॅटमधून वास येत असल्याची खात्री केली होती. तसेच दरवाजा वाजवला असता कोणीही दरवाजा उघडला नाही. सुमारे 16.30 वाजता सदर फ्लॅटमध्ये राहणारी व्यक्ती मनोज सहानी घाबरलेल्या अवस्थेत होता.
मी पाहून घेतो, कशाचा वास येतो. मी बाहेर चाललो आहे. मी पुन्हा रात्री 10.30 वाजेनंतर येणार असल्याचे सांगून तो निघून गेला. त्यावेळी त्याच्या पाठीवर एक काळ्या रंगाची सॅक होती. अशी माहिती पोलिसांना बिल्डिंगच्या रहिवाशांकडून मिळाली. अधीक माहिती घेतली असता सदर ठिकाणी मनोज साने हा एका तरुण महिले सोबत राहत असल्याचे समजले. यानंतर पोलिसांना काहीतरी अघटीत झाल्याबाबत संशय निर्माण झाला. पोलिसांनी सदरची माहिती वरिष्ठांना दिली व उपस्थित बिल्डिंगमधील लोकांची मदत मिळवून सदरचा फ्लॅटचे कुलुप उघडून आत प्रवेश केला.
आतमध्ये दुर्गंधी येत असल्याने आम्ही सर्वानी प्रथम हॉल, बाथरुम, टॉयलेट व दोन्ही बेडमध्ये प्रवेश करून पाहिले त्यातील एका बेडमध्ये काळ्यारंगाचे प्लास्टीक व एक इलेक्ट्रीकल मशीन रक्त लागलेली दिसून आले. नंतर जास्त वास येण्याचे ठिकाण किचन मध्ये प्रवेश केला तेव्हा सदर ठिकाणी फरशीवर डोक्यापासून कापलेले वेणी (महिलेचे केस वेणी घातलेले असे) दिसून आले. तसेच किचन ओट्यावर गॅस शेगडी व त्यावर कुकर त्यामध्ये मानवी मास शिजविलेले, पातेल्यामध्ये मानवी मास शिजविलेले वाश बेसीन मध्ये बकेट मध्ये हाडे अर्धवट जळालेले मानवी मांस हिरवी काळी बकेट व टब मध्ये ठेवलेले दिसून आले.
मनोज साने याने त्याच्या सोबत राहत असलेली महिलेचे तुकडे करून तिला जिवे ठार मारले. पुरावा नष्ट करण्याचे हेतुन तिच्या शरीराचे यांत्रीक करवत (इलेट्रीकल मशीन) ने तुकडे तुकडे करून कुकरमध्ये व पातेल्यामध्ये शिजविले व काही तुकडे भाजून बकेट, टब मध्ये ठेवले होते. पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळावरून उरलेले मासाचे तुकडे, इलेक्ट्रिक साहित्य, कुकरसह खून करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे. या निर्घण खूनामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe