क्रिकेटच्या बॅटने व चाकुने वार करून खून ! जमिनीच्या वादातून पत्नीच्या हत्येने कांचनवाडी हादरली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – जमिनीच्या वादातून पत्नीची क्रिकेटच्या बॅटने व नंतर चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. 11/07/2023 रोजी 09.00 ते 09.30 वाजेच्या सुमारास, कांचनवाडी, छत्रपती संभाजी नगर येथे ही घटना घडली. अतिशय वाईट पद्धतीने हा खून केल्याने परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संगिता सुखदेव सोलंकर (रा – कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजी नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. सुखदेव बापुराव सोलंकर (रा – कांचनवाडी, छत्रपती संभाजी नगर) असे आरोपीचे नाव आहे. मृत महिलेच्या भावाने पोलिस ठाणे गाठून रितसर फिर्याद दिली.
मृत संगिता सुखदेव सोलंकर व आरोपी सुखदेव बापुराव सोलंकर यांच्यामध्ये अलिकडच्या काही दिवसांपासून जमीनीवरून वाद होत होता. याचदरम्यान कांचनवाडी येथील त्यांच्या राहते घरी जमीनीच्या वादाच्या कारणावरुन संगिता सोलंकर यांच्याशी आरोपी सुखदेव सोलंकर यांनी भांडण केले. क्रिकेटच्या बॅटने व चाकूने मारुन गंभीर जखमी करून खून केला.
याप्रकरणी मृत महिलेचे भाऊ ज्ञानेश्वर दौलतराव लव्हटे (वय-30 वर्षे, व्यवसाय- खाजगी नोकरी, रा. शहापुर, ता.अंबड, जि.जालना, ह.मु. दत्तनगर, चित्तेगाव, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुखदेव बापुराव सोलंकर (रा – कांचनवाडी, छत्रपती संभाजी नगर) यांच्यावर सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुरन- 223/2023 कलम 302भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास Psi गोरे करीत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe