महाराष्ट्र
Trending

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्हा पुन्हा दणाणला ! भोकरदन तालुक्यात ५०० ट्रॅक्टरचा भव्य मोर्चा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० –संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणावरून समाज बांधवांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीतून पेटलेल्या या आरक्षणाच्या मागणीमुळे राज्यकर्त्यांची झोप उडाली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातील केदारखेडा ते भोकरदन असा ५०० ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला.

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथून मोर्चा भोकरदन शहरात दाखल झाला. हा मोर्चा भव्य दिव्य होता. मराठा बांधवासह इतर समाज बांधवांनीही मराठा आरक्षणाचे समर्थन केले. हा मोर्चा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते सिल्लोड रोडवरील महात्मा फुले चौकापासून पुन्हा छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी विसावला.

मराठा लेकींच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करून आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चातील तरुण मराठा बांधवांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी तीन मुलींनी मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मत व्यक्त केले. या मोर्चात मराठा शेतकरी बांधवांनी ५०० ट्रॅक्टर सहभागी करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले.

Back to top button
error: Content is protected !!