छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

भर पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा एक दिवस उशिराने !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – भर पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होणार आहे. देखभार दुरुस्तीचे कारण महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. यामुळे शहरातील काही भागांतील नागरिकांच्या पाण्याचे नियोजन एक दिवसाने कोलमडणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाअंतर्गत फारोळा येथील मॅनिफोल्ड पाईप गळती झाल्याने (५६ दलली) दि. ०३.०७.२०२३ रोजी योजना बंद करण्यात आलेली होती. देखभाल दुरुस्ती अंतर्गत कामे सुरु करण्यात आलेले असून यास खंडकाळ दहा ते बारा तास अपेक्षित असून देण्यात येणारा पाणी पुरवठा वितरण, वेळेवर होणे शक्य नाही.

यामुळे शहरातील नक्षत्रवाडी जलकुंभ, वेदांत जलकुंभ, कांतीचौक जलकुंभ, कोटला, जुब्ली पार्क पंपगृह, शहागंज जलकुंभ, जिन्सी जलकुंभ ,विश्वभारती जलकुंभ, गारखेडा जलकुंभ व ज्योतीनगर जलकुंभ येथून करण्यात येणारा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आलेला आहे.

शहरातील सर्व नागरिकांनी याची दखल घेऊन त्या प्रमाणे आपले पाणी विषयक नियोजन करावे व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा (वितरण) यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!