महाराष्ट्र
Trending

आष्टीच्या लघु पाटबंधारे उपविभागात लाच घेताना लिपिक जाळ्यात ! प्रवास भत्त्याचा धनादेश देण्यासाठी २० टक्के कमिशन !!

बीड, दि. २४ – आष्टीच्या लघु पाटबंधारे उपविभागात लाच घेताना लिपिक जाळ्यात अडकला. प्रवास भत्त्याचा धनादेश देण्यासाठी २० टक्के कमीशनची डिमांड करून महाशयाने त्यांच्यासाठी व त्यांचे सहकारी लिपिक यांच्यासाठी 3880 रुपये कार्यालयातच घेतले. आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

कुंदन अशोक गायकवाड (प्रथम लिपिक, मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालय, उस्मानाबाद.), पोपट श्रीधर गरुड (वरिष्ठ लिपिक, वर्ग -3, लघु पाटबंधारे उप विभाग आष्टी, जि बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांचा प्रवास भत्ता देयकाचा 19410 रुपयांचा धनादेश मंजूर केल्याचा मोबदला म्हणून कुंदन अशोक गायकवाड यांनी फोनवर 2000 रुपये लाचेची मागणी केली व पोपट श्रीधर गरुड यांनी तक्रारदार यांना मंजूर झालेला 19410 रुपयांचा धनादेश त्यांना प्रदान करण्यासाठी स्वतः व कुंदन अशोक गायकवाड यांचे मिळून एकत्रित असे 20% प्रमाणे लाच रक्कम 3882 रु मागणी करून तडजोडअंती 3880 रु स्वीकारण्याचे मान्य केले.

सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांना 19410 रुपयांचा धनादेश देण्यासाठी पोपट श्रीधर गरुड यांनी 3880 रुपयांची लाच रक्कम लघु पाटबंधारे उपविभाग आष्टी या कार्यालयात स्वीकारताच लाच रकमेसह पंच व साक्षिदार समक्ष ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टे आष्टी येथे गुन्हा दाखल करत आहोत.

Back to top button
error: Content is protected !!