राजकारण
Trending

औरंगजेबाचे फोटो घेऊन अमहमदनगरमध्ये नृत्य, गृहमंत्रालयाकडून कारवाई नाही ! वल्गना करणारे सरकार हिंदुत्वविरोधी: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – अहमदनगरमध्ये संदल दरम्यान औरंगजेबाचे फोटो झळकले त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत गृहमंत्रालयासह सत्ताधारी पक्षांवर सडकून टीका केली. हे सरकार हिंदुत्ववादी नसून हिंदुत्वविरोधी असल्याचे दानवे म्हणाले.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन नृत्य केलं गेलं आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अशी फार मोठी घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. दोन महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे संभाजीनगरमध्ये फोटो घेऊन नाचवले होते. मात्र अद्याप गृहमंत्रालयाने कोणतीही कारवाई केली नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

आम्ही कडक कारवाई करू अशा फक्त घोषणा सरकारकडून केल्या जातात. नगरमध्ये एका तरुणीच अपहरण केलं जातं, तिच्या आईवडिलांना उपोषणाला बसावं लागत ही दुर्दैवी गोष्ट आहे. सरकार हे सर्व सहन करत. सरकार हिंदुत्त्ववादाच नुसतं नाव घेऊन हे फक्त
वलग्ना करत. हेच सरकार हिंदुत्वाच्या बाजूने नाही तर हिंदुत्व विरोधी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!