छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

पडेगावच्या नवविवाहितेची छळास कंटाळून आत्महत्या, फुलंब्री तालुक्यातील पीरबावड्याच्या शोकाकूल कुटुंबाची पोलिसांत धाव, ५ जणांवर गुन्हा !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – आई-वडीलांनी लग्नामध्ये हुंडा दिला नाही, भांडे दिले नाही, तू चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेवून येण्यासाठी नवविवाहितेचा छळ केला. या छळास कंटाळून तिने आत्महत्या केल्याची घटना पडेगाव परिसरात घडली. यासंदर्भात नवविवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासर्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर कदीर शेख (रा.मु.पो. पीर बावडा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी छावणी पोलिस स्टेशनला दिलेल्या प्रथम महिती अहवालानुसार, त्यांची बहीण सानिया शफिक शेख (वय 20 वर्षे) हिचे दिनांक 07/05/2023रोजी त्यांचा मावस भाऊ शफिक रऊफ शेख (रा मुन्शी कॉलनी पडेगांव) यांच्या सोबत लग्न झाले होते. लग्नामध्ये संसार उपयोगी साहीत्य व दोन लाखांचे दागीने दिले होते.

लग्न झाल्या नंतर दिनांक 12/05/2023रोजी सानिया ही भेटण्यासाठी पीरबावडा येथे माहेरी आली होती. त्यांचे संयुक्त कुंटुंब असल्याने सर्व जण दिनांक- 12/05/2023 रोजी संध्याकाळी घरी गप्पा मारत असतांना सानियाने कुटुंबाला सांगितले की, माझे पती, सासु, सासरा, ननद, चुलते हे सानियाला लग्नामध्ये तुझ्या आई वडीलांनी हुंड्डा दिला नाही, लग्नामध्ये भांडे दिले नाहीत असे म्हणुन त्रास देतात.

टोमणे मारतात व फोर व्हीलर गाडी घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेवून ये, नाहीतर तुला आम्ही नांदवणार नाही असे म्हणतात. असे सांगितले होते. त्यानंतर दिनांक 19/05/2023 रोजी समीर कदीर शेख यांनी बहीण सानियाला सासरी पडेगाव येथे घेवून गेले. सानियाचे तिचे पती, सासरा सासु याच्याशी बोलून गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये दिले. व बाकीचे पैसे नंतर देतो असे सांगितले व बहीणीस सासरी सोडून समीर कदीर शेख हे घरी पीरबावड्याला परतले.

त्यानंतर समीर कदीर शेख यांचे बहीण सानियाशी फोनवर बोलणे होत असे. तेव्हा ती तिला तिचा पती सासु, सासरे नंणद है राहीलेले पैसे लवकर घेवून ये, असे म्हणून त्रास देत आहेत. वेळेवर जेवण देत नाहीत व मला सतत मारहण करीत असतात, असे सांगत होती.

दिनांक 15/06/2023 रोजी समीर कदीर शेख यांना त्यांचे मामा यांनी सांगितले की, त्यांना सानियाच्या पतीचे मामा यांचा फोन आला होता व त्यांनी सांगितले की, आपली सानिया हिने गळफास घेतलेला आहे. तिची प्रकृती सिरीयस आहे. तेव्हा सायंकाळचे 05.30 वाजलेले होते. त्यावर समीर कदीर शेख व सोबत आई वडील चुलते, मामा असे घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे 07.30 वाजेच्या सुमारास पोहोचले. सानियाचा मृदेह अपघात विभागामध्ये होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले होते. पी. एम केले असता डॉक्टरांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचा रिपोर्ट दिला आहे.

मृत सानियाचे भाऊ समीर कदीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सानियाचे पती शफिक रऊफ शेख, सासरा रऊफ युसुफ शेख, सासु, ननंद, चुलते अक्रम शेख युसुफ शेख (सर्व रा. पडेगाव) यांच्यावर छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!