महाराष्ट्र
Trending

प्रेमसंबंधातून मुलीला फूस लावून पळवून नेले ! बीड तालुक्यातील मोची पिंपळगावातील मुलीच्या अपहरणाची तक्रार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- प्रेमसंबंधातून मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आजोबाने पोलिसांत दाखल केली आहे. बीड तालुक्यातील मोची पिंपळगावातील मुलाने मुलीस फूस लावून पळवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी मुलीचे आजोबा (रा. मोची पिंपळगाव, ता. जि. बीड) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, काल दिनांक. 05/10/2023 रोजी रात्री 08.00 वाजेच्या सुमारास मुलीचे आजोबा बाहेर गेले होते. त्यानंतर ते घरी आले असता कळाले की, नात घरी नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कोठेच मिळून आली नाही. सदर मुलगी ही बीड येथे कॉलेजला मागील एका महिन्यापूर्वी गेली होती.

त्यावेळी गावातील एका मुलासोबत ती बोलत असताना नातेवाईकाने पाहिले होते. त्यानंतर सदर मुलीच्या आजोबाने सदर मुलाच्या घरी जावून त्याच्या आई, वडीलांना सांगितले की, तुमचा मुलगा माझ्या नातीसोबत आधून मधून काही कारण नसताना बोलत असतो, आपण एकाच गावातील आहोत त्याला समजावून सांगा हे अस बरोबर नाही. त्यानंतर काही दिवसाने कळाले की सदर मुलीचे व त्या मुलाचे आपसात प्रेमसंबंध आहेत. दरम्यान, ते दोघेही गावात कोठेही मिळून आले नाही.

दिनांक. 05/10/2023 रोजी रात्री 08 वाजेच्या पूर्वी मुलीस त्या मुलाने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या आजोबाने दिलेल्या तक्रारीनुसार त्या मुलावर बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!