पिसादेवीत विवाहितेची आत्महत्या: सहनशक्तीच्या पलीकडे झालंय… हे अस कवरक चालणार ! माझी पण इज्जत आहे, स्वभिमान आहे.. भिंतीवर लिहून आत्महत्या केल्याची आईची फिर्याद !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – वेळोवेळी चारित्र्यावर संशय घेवtन अपमानित करून मारहाण करणे. पतीच्या शारीरिक व मानसीक त्रासाला कंटालून आत्महत्या केली. सहनशक्तीच्या पलीकडे झालंय… हे अस कवरक चालणार. माझी पण इज्जत आहे, स्वभिमान आहे.. असा मजकूर भिंतीवर लिहून आत्महत्या केल्याची फिर्याद मृत विवाहितेच्या आईने पोलिसांत दाखल केली आहे. पिसादेवी (छत्रपती संभाजीनगर) येथील राहत्या घरात ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मृत विवाहितेच्या आईने (रा. सेलू ता.सेलू, जि. परभणी) पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार अंजलीचे लग्न पाडुरंग ज्ञानोबा शेरे (रा. पिसादेवी) यांच्या सोबत झाले. अंजलीचे पती पाडुरंग शेरे हे तिला घरातील घरगुती किरकोळ कारणावरून, चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करत होता. माहेरच्या नातेवाईकांना भेटू न देता शारीरिक व मानसिक त्रास देत होते. मुलगी अंजलीने तिच्या आईला सांगितले की, ती गर्भवती असून पाचवा महिना सुरु आहे. तिचा पती पाडुरंग हे म्हणत आहे की, तुला मुलगा झाला तर ठिक आहे नाहीतर मी तुला सोडून देईन व मी दुसरे लग्न करून घेईन असे धमकावून मारहाण करीत असे.
दरम्यान, दि 30/09/2023 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास अंजलीच्या आईला छत्रपती संभाजीनगर येथील नातेवाईकांनी फोन करून सांगितले की तुमची मुलगी अंजलीने गळफास घेतला आहे. तुम्ही लवकर या. ही माहिती मिळताच अंजलीचे आई-वडिल व नातेवाईक छत्रपती संभाजीनगर पिसादेवी येथील मुलीच्या घरी पोहोचले.
तेथे पाहिले की, मुलगी अंजलीने गळफास घेण्या अगोदर तिच्या हस्ताक्षरात रूमच्या भिंतीवर लिहिले होते की… आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झालय, मला सहन होत नाही. तुमचा स्वभाव मी कितीही प्रयत्न केले तरी तुमचा विश्वास नाही, मला माहीत आहे. तुम्ही आज ना उद्या परत मला गावाकडे नेवून सोडता परत मला आणणार नाही पण हे अस कवरक चालणार आहे, माझी पण इज्जत आहे, माझा पण स्वभिमान आहे माझा आणि माझ्या आई वडीलांचा अपमान सहन करायचा, खरच खुप थकले मी… असे भिंतीवर लिहीलेले अंजलीच्या आईने पाहिले.
त्यानंतर समजले की मुलगी अंजलीस उपचार कामी घाटी दवाखाना येथे घेवून गेले आहे. अंजलीचे आई वडील घाटीत गेले तेव्हा तेथील डॉक्टरांनी अंजली हिस तपासून मृत झाल्याचे घोषित केले. मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाडुरंग ज्ञानोबा शेरे (रा. पिसादेवी) यांच्यावर चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe