बीडमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा ! MSEB हेड ऑफिसच्या बाजुला इनामदार कॉलनीत दुसऱ्या मजल्यावर पर्दाफाश !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – बीडमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखान्याचा पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. MSEB हेड ऑफिसच्या बाजुला इनामदार कॉलनीत दुसऱ्या मजल्यावर हे मसाज सेंटर सरु होते. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून छापेमारी केली. एक जण पळून गेला. तीन महिला पुणे, ठाणे आणि परराज्यातील आढळून आल्या.
संजय पी. चंद्रन (रा. रेल्वे कॉर्टर, मेठुगडा रेल्वे हॉस्पीटल जवळ रेल्वे कॉर्टस सिकंदराबाद, हैदराबाद, राज्य आंध्रप्रदेश), बाबू बजरंग तावरे, गणेश सुबराम गोरे (दोन्ही रा. नाळवंडी), नासेर बिनसिमला चाऊस (रा. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बीड शहरात मेन रोडलगत एम.एस.ई.बी. हेड ऑफिसचे बाजुला इनामदार कॉलनीमध्ये नासेरबिन सिमला चाऊस यांच्या मालकीच्या बिल्डींगमध्ये दुसऱ्या मजल्यावर 1) बाबु बजरंग तावरे, 2) गणेश सुबराम गोरे (दोन्ही रा. नाळवंडी) हे स्पा मसाज सेन्टरच्या नावाखाली काही महिलांना पैशाचे अमिष दाखवून पुरुष ग्राहकांसोबत शारीरीक संबंध ठेवण्या साठी भाग पाडत आहे. आलेल्या पैशांची वाटणी करून घेवून महिलांकडुन वेश्या व्यवसाय करून घेत आहे. अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून छापेमारी करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलिसांनी दिले.
त्यानुसार पोलिस पथक व डमी ग्राहकबीड शहरातील नासेर बिनसिमला चाऊस (रा. बीड) यांच्या मालकीचे बिल्डींग जवळ पोहोचले. दोन्ही वाहने अतंरा- अंतरावर थांबवून वाहनामधून उतरुन अस्तित्व लपवून गटागटाने पोलिसांनी सापळा रचला. एका डम्मी ग्राहकासोबत छापापूर्व पंचनामा करताना पंचनाम्यातील 500 रु दराच्या 06 नोट देवून डमी ग्राहकास नासेर बिन सिमला चाऊस, रा.बीड यांच्या बिल्डींगमधील दुसऱ्या मजल्यावर पैसे घेवून पाठविले. सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय करतात का याची खात्री करून पोलिसांना हाताने इशारा करून कळवण्यास सांगितले. पोलिस पथक बिल्डींगच्या बाजुला रोडवर थांबले. त्यानंतर डम्मी ग्राहक नासेरबिन सिमला चाऊस, रा. बीड याच्या मालकीच्या बिल्डींग मधील दुसऱ्या मजल्यावर पोहोचला.
खात्री करुन गॅलरीमध्ये येवून पोलिसांना हाताने इशारा करताच पोह देशमुख, पोह नामदास, पोअं चव्हाण, पोअं कानतोडे, पोअं थापडे, महिला अंमलदार पोना ढगे, व दोन पंचासह नासेर बिन सिमला चाऊस, रा. बीड याच्या मालकीच्या बिल्डींग मधील दुसऱ्या मजल्यावर 19.30 वाजेच्या सुमारास पोलिस पथक पोहोचले. पोलीस व पंच यांनी नासेरबिन चाऊस यांच्या मालकीच्या बिल्डींग मध्ये दुसऱ्या मजल्यावर दरवाजा वाजवला असता एकाने तो उघडला असता काऊंटरच्या टेबलवर बसलेला दुसरा एक व्यक्ती गॅलरी मधील दुसऱ्या दरवाजातून बाहेर पळून गेला. पकडलेल्या व्यक्तीस त्याचे नाव गाव विचारले असता त्याने पानीकोटील संजय पी. चंद्रन (रा. रेल्वे कॉर्टर, मेठुगडा रेल्वे हॉस्पीटल जवळ रेल्वे कॉर्टस सिकंदराबाद, हैदराबाद, राज्य आंध्रप्रदेश) असे सांगितले.
सदर बिल्डींगमध्ये तीन रुम असून त्या पैकी एका रुममध्ये कॉटवर एक महिला व डमी ग्राहक बसलेला दिसला. सदर महिला नवी मुंबई ठाणे परिसरातील असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर सदर बिल्डींग मधील इतर दोन रूमची पाहणी केली असता दुसऱ्या रूममध्ये दोन महिला मिळून आल्या. राज्य पश्चिम बंगाल व पुणे येथील असल्याचे त्यांनी सांगितले. या महिलांना यातील पानीककोटील संजय पी. चंद्रन याच्या बाबत विचारणा केली असता , सदर व्यक्ती हा इतर ठिकाणाहून महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी पुरवित असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस पथकाने पंचसमक्ष सदर बिल्डींग मधील तीन रुमची झडती घेवून पंचनामा करण्यात आला. एकूण 24,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संजय पी. चंद्रन (रा. रेल्वे कॉर्टर, मेठुगडा रेल्वे हॉस्पीटल जवळ रेल्वे कॉर्टस सिकंदराबाद, हैदराबाद, राज्य आंध्रप्रदेश), बाबू बजरंग तावरे, गणेश सुबराम गोरे (दोन्ही रा. नाळवंडी), नासेर बिनसिमला चाऊस (रा. बीड) यांच्यावर शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe