लातूरच्या विवाहितेला रात्रभर एका पायावर उभे राहण्याची शिक्षा ! रात्रभर झोपायचे नाही, कोणाच्या बापात दम आहे म्हणून धमकावल्याची फिर्याद !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २- लग्नानंतर सुरुवातीचे साडेतीन महिने पतीने मूळ गावी भूम येथे चांगले नांदवले. त्यानंतर ड्युटीनिमीत्त पती पत्नी पुण्याला गेले. तेथे विवाहितेचा मानसीक व शारीरिक छळ करण्यात आला. सर्वांना नवे कपडे घेवून ये म्हणून विवाहितेला त्रास देण्यात आला. विवाहितेला रात्रभर एका पायावर उभे राहण्याची शिक्षा दिली. तू रात्रभर झोपायचे नाही, कोणाच्या बापात दम आहे म्हणून धमकावल्याची फिर्याद विवाहितेने दिली. या फिर्यादीवरून
यासंदर्भात पीडित महिलेने दिलेल्या विवेकानंद चौक पोलिस स्टेशन लातूर येथे दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि 22/04/2021 हिंदु रितीरिवाजाप्रमाणे मोहन प्रदिपराव पाटील (रा. राममंदिराशेजारी भूम जि धाराशिव) यांच्या सोबत विवाह झाला. विवाहानंतर पतीने साडेतीन महिने त्यांच्या मुळ गावी भूम येथे चांगले नांदवले.
त्यानंतर पती मोहन प्रदिपराव पाटील यांची सर्विस इंजिनर म्हणून पुण्याला ड्युटी असल्याने त्यांनी पत्नीला पुणे येथे राहण्यास घेवून गेले. तेथे कपडे घेऊन ये म्हणून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देणे सुरु झाले. तेव्हा विवाहितेने सासुला हा प्रकार सांगितला असता तू लय शहाणी आहेस का असे म्हणून सासू सासर्याने विवाहितेला शिवीगाळ केली. सर्वांना नवीन कपडे घेवून ये तेव्हाच तुला नांदवू असे धमकावले.
गेल्या वर्षी विवाहितेचा माझा भाऊ भेटायला आला होता तेव्हा विवाहितेचा पती बुट घेवून अंगावर धावला होता. तू रात्रभर झोपायचे नाही म्हणून विवाहितेलाही धमकी दिली होती. पती संशयित स्वभावाचा आहे. त्याने विवाहितेला रात्रभर एका पायावर उभा राहण्याची शिक्षा दिली. या सर्व प्रकारामुळे विवाहितेला चक्कर येत होती.
त्यानंतरही सासरच्या लोकांनी त्रास देणे सुरुच ठेवले होते. त्यानंतर भाऊ पुणे येथे विवाहितेकडे आला. सासु सासरा पतीने विवाहितेला तिच्या भावासोबत माहेरी (लातूर) येथे हाकलून दिल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी विवाहितेने पती मोहन प्रदिपराव पाटील, सासु,, सासरा प्रदिपराव भास्करराव देशमुख (सर्व रा. भूम जि धाराशिव) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe