छत्रपती संभाजीनगर
Trending

औरंगजेबचे पोस्टर लावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला ! लेबर कॉलनीच्या मोकळ्या जागेत बॅनर लावणाऱ्या युवकासह तिघांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – औरंगाबादच्या नामांतर विरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन चालू असतानाच काही समाजकंटकाकडून लेबर कॉलनीच्या मोकळ्या जागेत औरंगजेबचे पोस्टर लावून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. बॅनल लावणार्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री १२ ते १२.३० वाजेदरम्यान पोलिसांनी अतिशय चतुराईने हा प्रकार हाणून पाडला.

मीर आरेफ अली मीर फारुख अली (सहाय्यक फौजदार, पोलीस ठाणे सिटीचौक, छत्रपती संभाजीनगर) हे सध्या गोपनीय शाखेत काम करतात. दि. 17/03/2023रोजी 09.00 ते 21.00 वाजे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगाबाद नामातंर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामातराचा विरोध करण्यासाठी खासदार इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरु आहे.

या आंदोलनाच्या बंदोबस्त कामी सहाय्यक फौजदार मीर आरेफ अली मीर फारुख अली सोबत पोलीस ठाणे सिटीचौकचे पोउपनि हिवराळे, लाड, पो.स्टे. बेगमपुरा येथील पोउपनि विक्रम चौहाण तसेच सफौ आल्हाट, पोह फुले, पोअं भिंगारे, मपोना राजपूत आदी हजर होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 17/03/2023 रोजी अंदाजे 12.25 ते 12.30 वाजे दरम्यान चांदणे चौक येथे ज्या ठिकाणी जी-20 चे बॅनर लावलेल्या ठिकाणी लेबर कॉलनीच्या मोकळ्या जागेत औरंगजेबचे आलमगीर असे लिहिलेले 10x 10 कापडी रेग्झीनचे बॅनर लावताना 1) यासेर खान सिकंदर खान (वय 25 वर्षे, धंदा फ्रुट विक्री शहागंज रा. किराडपुरा) हा मिळून आला.

पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्या दरम्यान ज्या टू व्हीलरवर आणले ती स्कुटी डिव वरील व्यक्ती हा स्कुटी सह पळून गेला. त्या गाडीचा क्रमांक  MH-20-FL 1918 असा असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेले युवकास बॅनर कोठून बनविले त्या बाबत विचारणा करता त्याने सांगितले की, सदरचे बॅनर हे फय्याज लतीफ खान पठाण याच्या घरी बनवून आणले आहे, असे सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी 1) यासेर खान सिकंदर खान, 2) स्कुटी डिव MH-20-FL 1918 वरील पळून गेलेला व्यक्ती 3) फय्याज लतीफ खान पठाण (रा. कैसर कॉलनी मिनारा मस्जीदजवळ) यांच्यावर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!