शेंद्रा एमआयडीसीत महाअडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोचे उद्या प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन !
महाॲडव्हाटेज एक्स्पोच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला आढावा
संभाजीनगर लाईव्ह, दि ४ – शेंद्रा एमआयडीसी येथील ऑरीक सिटीत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘महाअडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोला’ जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज भेट देऊन पूर्वतयारीची पाहणी केली.
पाहणी केल्यानंतर प्रदर्शनाचे अतिशय काटेकोर नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक देखील केले. यावेळी पाण्डेय यांनी ऑरिक सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकानी,मसिहाचे अध्यक्ष किरण जगताप आदीसोबत प्रदर्शनातील इलेक्ट्रॉनिक ट्रांसफार्मर, सूर्या लाईट, मॅजिक इंडस्ट्रीज, प्री इंजीनियरिंग बिल्डिंग, काँक्रेट रोड कटिंग मशीन आदीसह विविध स्टॉलची पाहणी केली.
उद्या 5 जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीद्वारे या एस्पोचे उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य असा मंच आणि आसन व्यवस्थेची तसेच कॉन्फरन्स हॉल, व्हीआयपी हॉलची पाहणी करून जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी काही महत्त्वाच्या सूचना संबंधित आयोजकांना केल्या.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe