छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन व हवाई उड्डाण क्रियांना प्रतिबंध, पोलिस आयुक्तांचे आदेश !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.६ – कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोलद्वारे संचलित माय्क्रॊ लाईट एरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना दि.३१ ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंध घालण्यात येत असल्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत.

पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस आयुक्तांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी कारवाई यास अपवाद असेल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांनुसार हे प्रतिबंध घालण्यात आले असून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!