देश\विदेश
Trending

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ ! सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारीत सूत्रानुसार वाढीचा मंत्रिमंडळाचा निर्णय !!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाईपोटी मदतीचा अतिरीक्त हफ्ता देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Story Highlights
  • 01.01.2023 पासून हफ्ता लागू होणार

नवी दिल्ली, दि. 25 मार्च 2023 – केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुमारे ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू राहील.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाईपोटी मदतीचा अतिरीक्त हफ्ता देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. दिनांक 01.01.2023 पासून हा हफ्ता लागू असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

या अतिरीक्त भत्त्यात महागाईविषयक भरपाई म्हणून, मूळ वेतन /निवृत्तीवेतनाच्या विद्यमान 38% या दरात 4% टक्के इतकी वाढ केली आहे. महागाई भत्ता आणि महागाईपोटीचे सहकार्य म्हणून दिल्या जाणाऱ्या या सवलतीसाठी केंद्र सरकारच्या तिजोरीतून एकत्रितपणे दरवर्षी 12,815.60 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

केंद्र सरकारचे सुमारे 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख निवृत्तीवेतनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळेल. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींवर आधारीत, मान्यताप्राप्त सूत्रानुसारच ही वाढ केली असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!