महाराष्ट्र
Trending

परभणी, परळी मार्गे पूर्णा ते तिरुपती विशेष रेल्वे गाडी ! मराठवाड्यातील भक्तांना दिलासा !!

नांदेड, दि. ३० – मराठवाड्यातून तिरुपतीला जाणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. यामुळे मराठवाड्यातील भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1. गाडी क्रमांक 07609 पूर्णा-तिरुपती विशेष गाडी:- ही विशेष गाडी पूर्णा येथून दिनांक 03 जुलै ते 28 ऑगस्ट, 2023 दरम्यान दर सोमवारी सकाळी 10.25 वाजता सुटेल आणि परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, बिदर, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, पगीडीपल्ली, नालगोंडा, मिर्याल्गुदा, नदीकुडे, सत्तेनापल्ली, गुंटूर, तेनाली, बापटला, चिरला, ओंगोल, कावली, नेल्लोर, गुडूर, रेणीगुंठा मार्गे तिरुपती येथे मंगळवारी सकाळी 10.45 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्रमांक 07610 तिरुपती-पूर्णा विशेष गाडी:- ही विशेष गाडी तिरुपती येथून दिनांक 04 जुलै ते 29 ऑगस्ट, 2023 दरम्यान दर मंगळवारी दुपारी 15.10 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच पूर्णा येथे बुधवारी दुपारी 14.30 वाजता पोहोचेल.
या गाडीत स्लीपर, जनरल, वातानुकुलीत तृतीय श्रेणी, वातानुकुलीत द्वितीय श्रेणी असे एकूण 18 डब्बे असतील.

Back to top button
error: Content is protected !!