छत्रपती संभाजीनगरसिल्लोड
Trending

आरोग्य सेविकेची आयुष्यभराची PF ची रक्कम चोरीस, चोरटा सीसीटीव्हीत कैद ! सिल्लोडच्या सराफा मार्केटमधून भरदिवसा रिक्षातून साडेआठ लाख हातोहात लांबवले, पोलिस मागावर !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – आरोग्य सेविकेच्या आयुष्यभराच्या जमा पुंजीवर चोरट्यांनी डल्ला मारला. सिल्लोडच्या सराफा मार्केटमधून रिक्षातून ही रक्कम चोरट्याने मोठ्या शिताफिने हातोहात लांबवली. रिक्षाच्या स्पिकर बॉक्समध्य अगदी सुरक्षित ठेवलीली रक्कम चोरट्यांनी पाळत ठेवून ती चोरली. हे चोरटे परराज्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलिस त्यांच्या मागावर आहे.

(सेवानिवृत्त आरोग्य सेविका रा. सावंगी ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्या निवृत्त झालेल्या आहेत. त्या कासोद ता सिल्लोड येथे सन 2006 ते 2018 पर्यंत आरोग्य सेविका असल्याने त्यांचे बॅंक अकाउंट एस. बी. आय. बँक सिल्लोड येथे होते. सेवानिवृत्त झाल्याने भविष्य निर्वाह निधी मधील १५ लाख रुपये हे सिल्लोड येथील एस.बी.आय बँक सिल्लोड येथील अकाउंटवर आले होते.

त्यांना प्लॉट घेणे व सोने खरेदीसाठी सोबत त्यांच्या वहिनी व त्यांच्या मुलाचा मित्राच्या रिक्षामध्ये सावंगी येथून एस.बी. आय. बँक सिल्लोड येथे पैसे काढण्यासाठी आज, दि. 25/10/2023 रोजी दुपारी 12.30 वाजे दरम्यान पोहचले. एस.बी.आय. सिल्लोड बँकेतून 10,00000 (दहा लाख ) रु काढले. त्यानंतर तिघे रिक्षामध्ये बसून सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी सराफा मार्केट सिल्लोड येथील बळीराम लुटनशेठ दुकाना समोर पोहोचले. सेवानिवृत्त आरोग्य सेविकेने 1,50,000 लाख रुपये त्यांच्या हातातील बॅगमध्ये घेतले व राहिलेले 8,50,000रु रिक्षाच्या पाठीमागील सिटच्या स्पिकरच्या बॉक्समध्ये ठेवले होते.

आरोग्य सेविका व त्यांची वहिनी बळीराम लुटनशेठ दुकानामध्ये सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी गेल्या. रिक्षा चालक हे दुकानाच्या बाहेर थांबलेले होते. आरोग्य सेविकेने 1,57,000 रुपयांचे सोने खरेदी केले. दोन हजार रुपये कमी पडल्याने अंदाजे 01.15 वाजेच्या सुमारास रिक्षाचालकाला दुकानामध्ये बोलावून घेतले. त्यांनी दोन हजार रुपये दिले व परत रिक्षाकडे गेले तेवढ्यावेळात रिक्षातील बॉक्स उचकावून चोरट्यांनी रोख 8,50,000/- रुपये लंपास केले.  दरम्यान, सिल्लोडमध्ये परराज्यातील सराईत चोरट्यांची टोळी सक्रिय असून या चोरट्यांनी ही रक्कम लंपास केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Back to top button
error: Content is protected !!