गंगापूर
Trending

गंगापूरचे उद्योजक प्रताप साळुंकेंना एक कोटीची खंडणी मागितली ! दर्जेदार अग्रो सर्व्हिसेस कंपनी बळकावण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- कंपनीविषयी तिघेजण शेतकर्यांमध्ये बदनामी करत आहे. याशिवाय विविध शासकीय कार्यालयात कंपनीविरोधात तक्रारी दाखल करून कंपनी व जागा बळकावू असे धमकावून एक कोटीची खंडणी मागत असल्याचा खळबळजनक व्हिडियो प्रसारित करून गंगापूरच्या उद्योजकाने पोलिसांची मदत मागितली होती. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेवून प्रकरणातील सत्यता तपासून तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. ही माहिती कळताच ते तिघे पसार झाले असून पोलिस त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी रवाना झाले आहे.

1) वाल्मिक विठ्ठलराव सिरसाठ रा. फुलेनगर, गंगापूर 2) राजेंद्र पवार रा.गंगापूर 3) कल्याण वसंतराव साळुंके रा. छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत. गंगापूर येथील प्रताप वसंतराव साळुंके या उद्योजकांने सोशल मीडियांचे माध्यमांतून व्हिडीओ प्रसारित करून गंगापूर शहरातील 1) वाल्मिक विठ्ठलराव सिरसाठ, रा.फुलेनगर, 2) राजेंद्र पवार, रा. गंगापूर, 3) कल्याण वसंतराव सांळुके हे शेतक-यामध्ये दर्जेदार अग्रो सर्व्हिसेस लि.या कंपनी विषयी चुकीची बदनामीकारक माहिती देवून शेतक-यांना भडकावून कंपनीची व संचालकांची बदनामी करत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी ते एक कोटीची खंडणी मागत असून वारंवार त्रास देते आहेत. या त्रासाला कंटाळलो आहे व पोलिस अधीक्षक यांनी याची दखल घेवून मदत करावी, या आशयाचा व्हिडीओ संदेश प्रसारित केला होता.

मनिष कलवानिया यांना सदर व्हिडीओ संदेश प्राप्त होताच त्यांनी तात्काळ गंगापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सत्यजीत ताईतवाले यांना सत्य परिस्थीतीची खात्री व पडताळणी करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावरुन दिनांक 15/09/2023 रोजी वाल्मिक विठ्ठलराव सिरसाठ,व राजेंद्र पवार आणि कल्याण वसंतराव साळुंके असे तिघे हे तक्रारदार प्रताप वसंतराव सांळुके यांच्या घरी जावून दर्जेदार अग्रो सर्व्हिसेस लि. या कंपनीची व तुझी बदनामी थांबवण्याची असल्यास एक कोटी रुपये द्यावेच लागतील आणि ,एक कोटी रुपये नाही दिले तर तक्रारदार व त्यांच्या कंपनीची जनसामान्यात बदनामी करून कंपनीच्या विरोधात विविध शासकीय कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल करून कंपनी जमीनीसह बळकावण्याची धमकी देत होते.

त्या तिघांना तक्ररारदार समजावून सांगत असतांना वाल्मिक विठ्ठलराव सिरसाठ याने धमकावून पहिला हप्ता म्हणुन 1,00,000/- (एक लक्ष रूपये) रक्कम खंडणी म्हणून घेतली व तिघे निघून गेले परंतु यावर त्यांचे समाधान न झाल्याने त्याने पुन्हा वारंवार तक्रारदार यांना धमक्या देणे सुरू केले व कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तक्रारी अर्ज कायमचे बंद करून कंपनीची बदनामी थांबवायची असेल तर उर्वरित 99 लक्ष रुपये द्यावेच लागतील अशी धमकी देवून खंडणी मागत असल्याचे निष्पन्न झाले.

यावरुन पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार 1) वाल्मिक विठ्ठलराव सिरसाठ रा. फुलेनगर, गंगापूर 2) राजेंद्र पवार रा.गंगापूर 3) कल्याण वसंतराव साळुंके रा. छत्रपती संभाजीनगर या तिघांवर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये भादंवी कलम 384,386,500,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी हे फरार झाले असून पुढील तपास गंगापूर पोलीस करित आहे. पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ तक्रारीची गांर्भियाने दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलीस अधीक्षक यांनी ग्रामीण जिल्हा हद्यीतील कोणत्याही व्यवसायीक तसेच कंपनी मालक, संचालक किंवा उद्योजकांना अशा प्रकारे विनाकारण त्रास देवून त्यांच्याकडून बळजबरीने पैशांची मागणी करणा-या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नसून अशा व्यक्ती विरोधात सक्त व कठोर भूमिका घेण्यात येईल. अशा प्रकारे कोणी खंडणीची मागणी करत असेल तर तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल करावी. जिल्हयातील कंपनी मालक व व्यवस्थापक यांना अशा व्यक्ती पासून सुरक्षिततेची हमी देवून त्यांना तात्काळ पोलिसांची मदत उपलब्ध करून देण्या बाबत आश्वसत केले आहे.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, प्रकाश बेले, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत ताईतवाले, पोलीस निरीक्षक दीपक औटे, पो.उप.निरीक्षक, पोलिस अंमलदार पदम जाधव, अमोल कांबळे, अभिजीत डहाळे, मनोज नवले, राहुल वडमारे, तेनसिंग राठोड, संदीप राठोड यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!