महाराष्ट्र
Trending

समृद्धी महामार्गावर बसच्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू ! अपघातानंतर डिझेल टाकी फुटून अग्नितांडवात प्रवाशांचा कोळसा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १- समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याकडे जाणारी  विदर्भ ट्रॅव्हल्सची खाजगी बस पुलावर धडकून तिची डिझेल टाकी फुटून आग लागली. या आगित २५ जण जागीच मरण पावले. या बसमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. ८ जणांना वाचवण्यात यश आले. ही घटना समृद्धी महामार्गावरील  पिंपळखुटा शिवारात घडली. किरकोळ जखमी झालेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिनांक 01 जुलै रोजी रात्री 01:30 ते 02:00 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे सिंदखेडराजा हद्दीतील पिंपळखुटा शिवारात मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील चॅनेल नं. 332 जवळ यवतमाळ वरून पुणे जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्सची खाजगी बस (MH29BE 1819) ला हा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही बस पुलाला धडकली. त्यानंतर डिझेल टाकी फुलटी. अन् आग लागली. आग इतकी भीषण होती की, प्रवाशांना बाहेर पडण्यासही संधी मिळाली नाही.

या भीषण आगित 25 प्रवाशांचा जागिच मृत्यू झाला.  8 प्रवाशी बचावले आहेत. 25 जणांचे मृतदेह पूर्णतः जळालेले आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडत आहे.

चालक व क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले- या अपघातात चालक व क्लिनर हे वाचले आहे. त्यांना कोणताही मोठा मार लागलेला नाही. या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाणे सिंदखेड राजा येथे त्या दोघांना नेण्यात आले आहे. पोलिस त्यांची चौकशी करीत आहेत. हा अपघात कसा झाला, याची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे. शेख दानीश शेख इस्माईल (रा. दारव्हा जि. यवतमाळ) असे चालकाचे नाव असून संदिप मारोती राठोड (वय 31, रा. तिवसा) असे क्लिनरचे नाव आहे. दोघेही किरकोळ जखमी झाले.

जळालेल्या २५ जणांची ओळक पटणे अवघड, डीएनए चाचणी – विदर्भ ट्रॅव्हल्सच्या या खाजगी बस (MH29BE 1819) मध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. नागपूरहून वरून पुण्याला ही बस चालली होती. घटना इतकी भयंकर आहे की यातील जळालेल्या मृतदेहाची ओळख पटणे अवघड आहे. ट्रव्हल्सकडून एकूण प्रवाशांची नावे कळाली आहेत, मात्र, मृतदेह नेमका कोणाचा हे ओळखणे अवघड झाले आहे. त्यामुळे डीएनए चाचणी करून नातेवाईकांना मृतदेह देण्यात येणार आहे.

२५ जणांचा होरपळून घटनास्थळीच मृत्यू, आठ जणांना वाचवण्यात यश ड्रा कंड, एकाला संभाजीनगरला हलवले. २५ मृतांना ओळख पटवणे कठीण सर्वांची नावे आहेत परंतू कोणता मृतदेह कोणाचा आहे, हे ओळखणे कठीण आहे. यासाठी फॉरन्सिक लॅबची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती. ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुलावर कोसळली डिझेलची टाकी फुटून आग लागली.

Back to top button
error: Content is protected !!