फुलंब्रीमहाराष्ट्र
Trending

फुलंब्रीच्या भारत फायनान्स इन्क्लुजन बँक मॅनेजरला दुचाकीस्वारांनी लुटले ! जालना जिल्ह्यातील भाकरवाडीजवळ डोळ्यात मिरची पावडर फेकून दोन लाखांची बॅग हिसकावून पसार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – दिवसभरात बचत गटाचे पैसे जमा करून फुलंब्रीकडे दुचाकीवर निघालेल्या दोघा मॅनेजरला जालना जिल्ह्यात पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी डोळ्यात मिरची पावडर फेकून लुटले. जालना जिल्ह्यातील भाकरवाडीजवळ भररस्त्यात पाऊस कोसळत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी वाटमारी केली. मिरची पावडर डोळ्यात फेकल्याने दुचाकीवरील दोन्ही मॅनेजर खाली पडले व लुटारुंनी महिला मॅनेजरच्या हातावर काठी मारून बॅल हिसकावली व आल्या मार्गाने म्हणजे भाकरवाडीकडे ते लुटारू पळून गेले. एकूण 1,98,747 रुपयांचा ऐवज लुटारुंनी लांबवला. फुलंब्री येथील भारत फायनान्स ईन्क्लुजन लिमिटेड बँकेत काम करणार्या दोन मॅनेजरला भररस्त्यात लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अक्षदा पि.बाळु गंगावणे (व्यवसाय नोकरी संगम मॅनेजर, भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड बँक शाखा फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर, रा. गौतमनगर फुलंब्री) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्या भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड बँक शाखा फुलंब्री येथे सहा महिन्यांपासून संगम मॅनेजर म्हणुन कामाला आहे. त्या अनुशंगाने बँकेचे बचत गटाचे पैसे गोळा करण्यासाठी त्यांना संबंधित गावाला जावे लागते.

दि. 21/09/20023 रोजी संगम मॅनेजर अक्षदा पि.बाळु गंगावणे व त्यांच्या सोबत भारत फायनान्स ईन्क्लुजन लिमिटेड बँक शाखा फुलंब्रीचे संगम मॅनेजर शशांक जैस्वाल (रा. गोळेगाव ता. सिल्लोड) दोघे मोटारसायकलने मौजे भाकरवाडी (ता. बदनापूर) येथे बचतगटाचे पैसे गोळा करण्यासाठी सकाळी 09.00 वाजता गेले. तेथे शशांक जैस्वाल हे संगम मॅनेजर अक्षदा पि.बाळु गंगावणे यांना मौजे भाकरवाडी येथे सोडुन ते पुढे त्यांच्या कामासाठी चारटा, शिरसगाव घाटी येथे निघून गेले. संगम मॅनेजर अक्षदा पि.बाळु गंगावणे या बचत गटाचे पैसे गोळा करण्यासाठी मौजे भाकरवाडी येथे थांबल्या.

सकाळी 09.00 ते 12.00 वाजे पर्यत भाकरवाडी येथील दोन महिलांच्या घरी बचतगटा संदर्भात दोन मीटिंग घेतल्या व तेथे काही पैसे जमा केले. त्यानंतर 12.30 पासुन 14.30 वाजेपर्यत आणखी एका महिलेकडे मिटिंग घेतली व त्यानंतर पाऊस सुरु झाल्याने त्या तेथेच थांबल्या. 04.30 वाजेच्या सुमारास फुलंब्री येथून बँकेचे दुसरे संगम मॅनेजर अभिषेक बाबुराव कुंभार (वय 19 वर्ष रा. कमळापुर ता. जि. छत्रपती संभाजीनगर) हे मोटारसायकलवर आले.

काही वेळाने पाऊस कमी झाल्यावर दोघांनी गावात व शेतात बचतगटाच्या सभादाकडे जाऊन पैसे जमा केले. सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत हे काम केले. त्यानंतर परत पाऊस सुरु झाल्याने संगम मॅनेजर अक्षदा पि.बाळु गंगावणे व सोबतचे अभिषेक कुंभार असे दोघे एका महिलेकडे थांबले व त्यानंतर पाऊस कमी झाल्याने दोघे फुलंब्रीला जाण्यासाठी मोटारसायकल ने निघाले. दिवसभरात बचतगटाच्या सभासदाकडून जमा झालेले एकूण 1,82,747 रुपये, बँकेचा सॉमसंग कंपनीचा टॅब व मोबाईल, बायोमेट्रीक थंब मशीन आदी ऐवज संगम मॅनेजर अक्षदा पि.बाळु गंगावणे यांच्या बॅगमध्ये होते.

अंदाजे अर्धा किलोमिटर नांदखेडाकडे येत असतांना परत पाऊस वाढल्याने मोटारसायकलने सावकाश जात असताना रात्री 08.30 वाजेच्यादरम्यान पाठीमागून एक मोटारसायक आली. त्यावर दोन अनोळखी होते. बाजुला मोटारसायकल आणून ए भैय्या थांब असे ते अभिषेक बाबुराव कुंभार यांना म्हणाले. त्यामुळे दोघांनी त्यांच्याकडे बघितले तेंव्हा त्यांनी दोघांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले. त्यामुळे दोघे मोटारसायकलसह रोडवर खाली पडले.

मिरची पावडरमुळे दोघांच्या डोळ्याना ईजा होऊन त्रास होत असतानाच एकाने संगम मॅनेजर अक्षदा पि.बाळु गंगावणे यांच्या हातातील बॅग हिसकवली. आल्या मार्गाने भाकरवाडीकडे ते पळून गेले. त्यानंतर मिरची पावडरमुळे खुप त्रास होत असल्याने दोघेही अर्धातास त्याच ठिकाणी बसून होते. त्यानंतर दोघे कसेबसे मोटारसायकलवर बसून सावकाश गतीने नांदखेडाकडे जाणार्या रोडवर एक घर दिसले. उजेड पाहून दोघे त्याठिकाणी थांबले. त्यांना हकिकत सांगून मदत मागितली. त्यानंतर त्या घरावरील मांणसाच्या मोबाईलवरुन बँकेचे मॅनेजर प्रविण बोडसे यांना माहिती दिली व त्याच फोनवरून डायल 112 वर पोलिसांना कॉल करून माहिती दिली. कही वेळातच बँक मॅनेजर आले व त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. महिला मॅनेजरच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!