महाराष्ट्र
Trending

पोलिस हवालदाराने चक्क पोलिस ठाण्यातच बिनधास्त लाच घेतली अन् जाळ्यात अडकला ! तालुका जालना पोलिस ठाण्यात ५ हजार घेताना रंगेहात पकडले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – एका प्रकरणातील दाखल गुन्ह्यात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पंचासमक्ष 5,000 रुपये लाच घेताना पोलिस हवालदारास रंगेहात पकडण्यात आले. तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये पंचासमक्ष लाच घेताना पोलिस हवालदार सापळ्यात अलगद अडकला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

उदलसिंग मानसिंग जारवाल (वय 53 वर्षे, पद – पोहवा, पोलीस ठाणे तालुका जालना रा. यशवंतनगर अंबड रोड जालना जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. यातील तक्रारदार यांच्या विरूद्ध पोलीस ठाणे तालुका जालना गु र नं. 420/2023 कलम 279, 323,327,337,504,506 प्रमाणे दाखल आहे. तक्रारदार यांच्यावर दाखल गुन्ह्याचा तपास तक्रारदार यांच्या बाजुने करून लवकर दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी आज दि.18.10.2023 रोजी आरोपी पोलिस हवालदार उदलसिंग जारवाल यांनी तक्रारदारास पंचासमक्ष 5,000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यावरून सापळा कारवाई दरम्यान दिनांक 18.10.2023 रोजी आरोपी पोलिस हवालदार उदलसिंग मानसिंग जारवाल यांना तक्रारदार यांच्याकडून त्यांचेवर दाखल गुन्ह्यात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पंचासमक्ष 5,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस ठाणे तालुका जालना, जि. जालना येथे रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी पोलिस हवालदार जारवाल यांच्याकडून 5,000 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी जारवाल यास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, जालना,  सापळा पथक – PN/ गजानन घायवट, गजानन खरात, अतिश तिडके PC/गणेश बुजडे, गणेश चेके, जावेद शेख,संदीपान लहाने, चालक विठ्ठल कापसे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!