जालन्यात कॉफी शॉपच्या नावाखाली युवक युवतींचे अश्लील कृत्य, कुंटणखान्यावर छापेमारी ! कॅबिन व खोलीसाठी 500 रुपये, दोन कपल पोलिसांच्या जाळ्यात !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ : – जालन्यात कॉफी शॉपमध्ये सुरु असलेल्या युवक युवतींच्या अश्लील कृत्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. सदर कुंटणखान्यावर छापेमारी करून पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. कॅबिन व खोलीसाठी 500 रुपये देवून युवक व युवती या ठिकाणी अश्लिल कृत्य करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. तत्पूर्वी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मंठा रोड प्रिती सुधांशु नगर, जालना येथील कॅफे फुड ट्रेजर कॉफी शॉपमध्ये हा गोरखधंदा सुरु होता.
सदर बाजार पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, “मंठा रोड प्रिती सुधांशु नगर, जालना कॅफे फुड ट्रेजर कॉफी शॉपमध्ये महाविद्यालयीन मुला मुलींकडून प्रवेश करीता 150/-रुपये घेऊन बसण्यासाठी जागा उपलब्ध केल्या जाते. कॅबिन व खोली मध्ये 500/-रुपये प्रती तास घेऊन आणखी जागा उपलब्ध केली जाते. त्या जागेमध्ये मुला मुलींना अश्लिल कृत्य व कुंटणखाना चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते.
ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोन डमी ग्राहक (कपल) सदर ठिकाणी पाठवण्याचा सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पंच व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, महिला पो.हे.का. कल्पना बोडखे पो. अं. भरत ढाकणे, पो.अं. प्रदिप करतारे, चालक सपोउपनि खरात व सपोउपनि हिवाळे यांच्यासह पोलिस पथक तयारीने रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरु बच्चन चौक मार्गे मंठा रोडने घृष्णेश्वर चौक येथे जाऊन थांबले. सापळा रचून व डमी ग्राहक यांना कॅफे फुड ट्रेजर कॉफी शॉपमध्ये पाठवले.
त्यांच्या लगोलग पोलिस पथकाने कॅफेवर 15.00 वाजेच्या सुमारास छापा मारला. काऊंटवर एक जण बसलेला होता. त्याने आपले नाव सुमित कैलाश केसापुरे (वय 29 वर्षे रा. भावसार गल्ली, जालना) असे सांगितले. कॅफेमध्ये आत जाऊन पाहता पूर्व बाजूस दोन वेगवेगळे कम्पार्टमेंट दिसले. त्यामध्ये दोन वेगवेगळे कपल बसलेले व ते कपल है एकमेकांना अलिंगन देऊन, एकमेकांचे चुंबन घेऊन, अश्लिल कृत्य करताना दिसून आले.
सदर कंपार्टमेंन्टच्या पश्चिम बाजूला दोन कंपार्टमेन्ट दिसून आले. एक 4 बाय 6 लांबी रुंदीचे कंपार्टमेंट व त्यामध्ये सोफा, टेबल लावलेला व फुगे दिसून आले. दुसरे मोठे 05 बाय 07 लांबी रुंदी कंम्पार्टमेंट असून त्यामध्ये सोफा सेट व टेबल ठेवलेला होता. तसेच सदर कंपार्टमेन्टला लागून किचन रुम होती.
याप्रकरणी एसबी जालना पोलिस स्टेशनमध्ये सुमित कैलाश केसापुरे (वय 29 वर्ष रा. भावसार गल्ली, जालना) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe