छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

शाळेच्या कार्यालयाला टाळे ठोकले, मालमत्ता कर थकवल्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची कारवाई !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून मालमत्ता कर थकवणार्यां विरोधात कारवाई करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज, २३ ऑक्टोबर रोजी वॉर्ड क्र 78 विशाल नगर येथे वंडर गार्डन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयाला सील ठोकण्यात आले.

प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली मोहीम तीव्र स्वरूपात सर्व झोन कार्यालय येथे राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज दिनांक २३ ऑक्टोबर रोजी वॉर्ड फ सहाय्यक आयुक्त प्रसाद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र 78 विशाल नगर येथे श्री आनंद प्रवीण सोमय्या, वंडर गार्डन प्रा. शाळा, थकबाकी रक्कम रु 5,26,489* बाबत मुख्याध्यापक कार्यालय सील करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ कर निर्धारक व संकलक दत्तात्रेय केनेकर, पथक प्रमुख कं.क.अ. धिरज राठोड, क.लि. श्रीपाद सुभेदार, क.लि. संजय साबळे, कं.क.अ. शिवाजी चित्रक, वसुली कर्मचारी रोहित गायकवाड, महेश दौंड, सहदेव राठोड,शुभम कीर्तीशाही, संकेत चव्हाण,सोहेल खान यांची उपस्थिती होती.

झोन कार्यालय ०७ अंतर्गत थकीत मालमत्ता कर धारकांनी आपल्या कडील थकीत मालमत्ता कर भरणा करावा अन्यथा
मोठ्या थकबाकीदारांवर अजून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त प्रसाद देशपांडे यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!