छत्रपती संभाजीनगर

अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत लैंगिक अत्‍याचार; २३ वर्षांच्या तरुणाला २० वर्षे तुरुंगवास!!, हुसेन कॉलनीत घडली होती घटना

संभाजीनगर, दि. १३ ः अल्पवयीन मुलीला मित्राच्या घरी डांबून ठेवत लैंगिक अत्‍याचार करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला २० वर्षे कारावासाची शिक्षा सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सुनावली. एकूण ३० हजार रुपयांचा दंडही त्‍याला ठोठाविण्यात आला आहे. अनिल उर्फ नंदू शेषराव शेलार (रा. हुसेन कॉलनी, संभाजीनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

नंदूला गुन्ह्यात मदत करणाऱ्या प्रकाश रतन सास्ते (३०, रा. भोकरदन, जि. जालना. ह. मु. हुसेन कॉलनी, संभाजीनगर) यालाही ३ महिने सक्‍तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंडाच्या रकमेतून २० हजार रुपये पीडितेला पुनर्वसनासाठी देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.

१५ वर्षीय पीडितेने या प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २७ मार्च २०१९ रोजी गल्लीत उभी असताना ओळखीच्या अनिल शेलारने तिला तुला काही सांगायचे आहे, असे म्हणत प्रकाशच्या घरी नेले. तिथे तिला डांबून ठेवले.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

सायंकाळी दारू पिऊन येत तिला जीवे मारण्याची धमकी दिली व लैंगिक अत्‍याचार केला. त्यानंतर पीडितेला सोडण्यात आले. पोलीस उपनिरिक्षक महादेव पुरी यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

Back to top button
error: Content is protected !!