कन्नडछत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यात दोन एटीएम फोडले!; १० लाखांचा डल्ला

संभाजीनगर, दि. १३ ः जिल्ह्यात एटीएम फोडीच्या दोन घटना घडल्या. संभाजीनगरातील पडेगावजवळ झालेल्या चोरीत ८ लाख ११ हजार ९०० रुपयांची रोकड तर कन्नड शहरातील चाळीसगाव रोडवरील छल्लानी हॉस्पिटलजवळील एटीएममधून २ लाख ३५ हजार ६०० रुपये लांबविण्यात आले. या घटना काल, १२ डिसेंबरला समोर आल्या.

पडेगाव भागात इंड्‌सइंड बँकेचे एटीएम आहे. कॅश लोडिंगच्या कामासाठी एटीएममध्ये आलेल्या मुकेश संघमती लखमल यांना चोरी झाल्याचे कळले. त्‍यांनी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत पवार यांना कळवले. एटीएम मशीन फोडलेले व अर्धवट जाळल्याचे दिसून येत आहे.

त्यातील रोकडही गायब केलेली होती. छावणी पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. व्यवस्थापक पवार यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक अंबादास मोरे करत आहेत.

कन्नडमध्ये कटरने एटीएम कापले…
कन्नडच्या छल्लानी हॉस्पिटलजवळील इंडिया १ बँकेचे एटीएम आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना एटीएमचा दरवाजा उचकटलेला दिसला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्‍थळी भेट देऊन पंचनामा केला. इंडिया १ एटीएमचे डिस्‍ट्रीब्‍युटर पारस गौतमचंद छाजेड (रा. बीड बायपास, संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार भूषण सोनार करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!