सिल्लोड
Trending

सिल्लोडच्या डॉक्टरांना साधू बाबाने गंडवले, डबल करून देतो म्हणून ३२ हजारांना लुटले ! सोनार हॉस्पिटलच्या कबिनमध्ये २० रुपयांचे ७० करून दाखवले अन्… !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – आपल्या कॅबिनमध्ये पेशंट तपासण्यासाठी बसलेल्या डॉक्टरांना भगवे कपडे परिधान केलेल्या साधू बाबाने चलाखीने गंडवले. तो साधू बाबा डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेला. २० रुपयांचे ७० रुपये चलाखीने करून दाखवले व विश्वास संपादन केला. डॉक्टरांनीही २ हजार व हातातील पाच ग्रॅम सोन्याची अंगठी (३० हजार) त्या साधू बाबाला दिली. त्यानंतर चलाखीने ३२ हजारांचा ऐवज घेवून तो भगवे कपडे परिधान केलेला साधू बाबा तेथून पसार झाला. ही घटना सिल्लोड येथील सोनार मुलांच्या हॉस्पिटलमध्ये घडली.

वार्डबॉय सचिन देवीदास खंडागळे (वय 30 वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी, सोनार मुलांचे हॉस्पिटल, रा. टिळकनगर सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 29/9/2023 रोजी नेहमी प्रमाणे सकाळी 09.30 वाजता सोनार मुलांचे हॉस्पिटल येथे कामावर हजर होतो व डॉ. स्नेहल कुमार सोनार हे सकाळी 11.15 वाजेच्या दरम्यान नेहमी प्रमाणे हॉस्पिटल येथे पेशन्ट तपासणीसाठी आले होते.

दुपारी 1.00 वाजेच्या सुमारास वार्डबॉय सचिन खंडागळे हे हॉस्पिटलमध्ये असताना एक भगवे कपडे परिधान केलेला साधू बाबा व एक पांढरे कपडे परिधान केलेला साधू बाबा हे दोघे हॉस्पिटलमध्ये आले व त्यांनी विचारले आम्हाला डॉक्टर साहेबांना भेटायचे आहे. तेव्हा वार्डबॉय सचिन खंडागळे यांनी भगवे कपडे परिधान केलेल्या बांबांना डॉक्टर सोनार साहेब यांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये सोडले व पांढरे कपडे परिधान केलेले बाबा हे बाहेर बसले.

डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेलेल्या भगवे कपडे परिधान केलेल्या साधू बाबाने डॉक्टर सोनार यांचेशी दहा ते पंधरा मिटीने चर्चा केली व नंतर दोन्ही बाबा तिथून निघून गेले. अर्धा तासानंतर डॉक्टर सोनार यांनी वार्डबॉय सचिन खंडागळे यांना  बोलावले व ते म्हणाले की, मला भेटायला आलेला साधु बाबा याने मला 20 रुपयाचे 70 रुपये करून दाखविले म्हणून माझा त्याच्यावर विश्वास बसला व तो साधू बाबा मला म्हणाला मी तुमचे पैसे दुपट्ट करून देतो व तुमच्या हातातील सोन्याची एक अंगठीची दोन अंगठया करून देतो असे तो म्हणाला.

त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या पाँकीटमधील रोख 2000 रुपये (पाचशे रुपयाचे 4 नोटा) व एक पाच ग्रॅम सोन्याची अंगठी (30,000 रुपये  स्वताहून त्यास हाताच्या बोटातून काढून दिली आहे. त्याने माझा विश्वासघात केला आहे. असे सांगितल्याने वार्डबॉय सचिन खंडागळे व हॉस्पिटल येथील सहकारी अशोक सांडु आरके यांनी सराफा मार्केटमध्ये सदर दोन्ही साधू बाबा याचा शोध घेतला ते मिळून आले नाही. त्यांतर आमची सर्वांची खात्री झाली की, सदर साधू बाबा यांनी डॉ. स्नेहल कुमार सोनार यांचा विश्वास संपादन करून त्यांचा विश्वासघात केला.

याप्रकरणी वार्डबॉय सचिन देवीदास खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या दोन साधू बाबावर सिल्लोड शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!