सिल्लोड
Trending

सिल्लोड तहसीलच्या गेटवर वृद्ध दाम्पत्यास गंडवले ! मोदींचे ५ हजार मिळवून देतो म्हणून लुबाडले, सिल्लोडचे तहसील प्रशासन झोपेत !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- शासनाच्या श्रावण बाळ योजनेची फाईल तयार करण्यसाठी सिल्लोडच्या तहसील कार्यालयात निघालेल्या वृद्ध दाम्पत्यास गेटवरच लुटले. मोदीचे पाच हजार मिळवून देतो. त्यासाठी पाच फोटो काढावे लागतील. तुमच्या अंगावरील सोने फोटोत दिसता कामा नये. ते सोने माझ्याजवळ द्या. त्यानंतर फोटो काढून माझ्याकडे द्या मी साहेबांकडून तुम्हाला मोदींचे ५ हजार मिळवून देतो असा विश्वास संपादन केला. वृद्ध महिलेने त्याच्याकडे सोने देऊन फोटो काढण्यासाठी गेल्यावर भामटा सोने घेवून पसार झाला. सिल्लोड तहसीलच्या गेटवरच हा प्रकार झाल्याने तहसील प्रसासन झोपेत आहे का ? वृद्ध दाम्पत्याची अशी फसवणूक होत असताना प्रशासन अशा भामट्यांचा चोख बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे.

हमीदाबी शेख सुभान (वय 65 वर्ष व्यवसाय घरकाम रा. अब्दालशहानगर सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) असे फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. शासनाची श्रावण बाळ योजनेच्या लाभाची फाईल तयार करण्यासाठी सदर वृद्ध महिला पती शेख सुभान शेख खालेक दोघे सिल्लोड तहसील कार्यालयात गेले होते. दिनांक 03/07/2023 रोजी दुपारी 14.00 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालय सिल्लोड येथे जात आसताना तहसील कार्यालयाच्या गेटवर दोघांना एक अनोळखी व्यक्ती भेटला.

त्याने सदर वृद्ध दाम्पत्यास विचारले की, तहसील कार्यालयात कशासाठी आले. तेंव्हा वृद्ध दाम्पत्याने सांगितले की, आम्हाला श्रावण बाळ योजनेत नाव टाकायचे आहे. तेंव्हा त्याने वद्ध दाम्पत्यास सांगितले की, मोदींचे 5000 रुपये भेटणार आहेत. त्याची फाईल बनवून देतो. तो पुढे म्हणाला की फाईलसाठी पासपोर्ट साईजचे फोटो लागतील. तुम्हाला फोटो काढावे लागेल. त्यावर वद्ध दाम्पत्याने त्याला विचारले की कीती फोटो लागतील यावर त्याने पाच पाच फोटो काढा असे सांगितले. तो सदर वृद्ध महिलेला म्हणाला तुम्ही तुमच्या कानातील व गळ्यातील सोने माझ्या जवळ द्या, मी तहसीलमध्ये जावून साहेबांना दाखवून येतो.

तोपर्यंत तुम्ही फोटो काढून या. यावर सदर वृद्ध महिलेने त्यास विचारले की, सोने का काढून देऊ असे विचारले तेंव्हा तो म्हणाला फोटोमध्ये सोने आले तर योजनेचा लाभ भेटणार नाही असे म्हणुन त्याने वद्ध दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सदर वृद्ध महिलेने कानातील चार ग्रॅमच्या 04 सोन्याच्या बाळ्या व गळ्यातील तीन ग्रॅमचा पत्ता व तीन ग्रॅम सोन्याचे गोल मणके काढून त्या अनोळखी व्यक्तीजवळ दिले. त्यानंतर वद्ध दाम्पत्य फोटो काढण्यासाठी तेथून निघून गेले. फोटो काढून वद्ध दाम्पत्य तहसील गेट समोर आले असता तो व्यक्ती तेथून पसार झाला होता.

दिनांक 03/07/2023 रोजी 14.00 वाजेच्या दरम्यान तहसील गेट समोर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूण ३० हजारांचे दागिने त्या भामट्याने लांबवले. याप्रकरणी सिल्लोड सिटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!