एका भावाच्या डोक्यात कोयत्याने वार तर दुसऱ्याला बैलगाडीच्या शिवळाने मारले ! पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडीतील घटना !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – बैलगाडीच्या रस्त्यात उभी असलेली मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगितले म्हणून कोयत्याने डोक्यात वार केला. त्यानंतर दुसर्या ठिकाणी दुसर्या भावाला बैलगाडीच्या शिवळाने मारहाण करण्यात आली. ही घटना पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी येथे घडली. तुळशिराम शिवाजी ढोकळे, भाऊ गणेश शिवाजी ढोकळे अशी जखमींची नावे आहेत. 1) ज्ञानेश्वर थोटे 2) लहु थोटे 3) भागवत थोटे अशी आरोपींची नावे आहेत.
तुळशिराम शिवाजी ढोकळे (वय 37 वर्ष व्यवसाय शेती रा. ज्ञानेश्वरवाडी ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, गावाच्या बाहेर त्यांचे खळे असून शेजारी ज्ञानेश्वर थोटे यांचे खळे आहे. दि.3/07/2023 रोजी सायंकाळी 05.00 वाजेच्या सुमारास तुळशिराम शिवाजी ढोकळे यांचा मोठा भाऊ गणेश शिवाजी ढोकळे हा शेतातून बैलगाडी घेवून गावात घरी येत होता. खळ्याच्या शेजारी असलेले ज्ञानेश्वर थोटे व त्यांचा मुलाग भागवत थोटे यांची मोटारसायकल बैलगाडी जाण्याच्या रसत्यात उभी होती.
तेंव्हा गणेश ढोकळे हा भागवत थोटे यांना म्हणाला की तुमची मोटारसायकल रस्त्याच्या बाजुला घ्या. तेंव्हा भागवत थोटे हा गिन्नी गवत तोडत होता. तो म्हणाला की माझ्या हातात कोयता आहे तुला पाहून घेईल असे बोलून शिवीगाळ केली. त्यानंतर गणेश शिवाजी ढोकळे यांच्या डोक्यात कोयता मारून जखमी केले. तेंव्हा गावातील लोकांनी भांडणाची सोडवा सोडव केली.
दरम्यान, तुळशिराम शिवाजी ढोकळे हे खळ्याकडे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता तेथे असलेले ज्ञानेश्वर थोटे, लहु थोटे, भागवत थोटे यांनी शिवीगाळ केली. बैलगाडीची शिवळ तुळशिराम शिवाजी ढोकळे यांच्या दोन्ही हातास व डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत दोन्ही भाऊ जखमी झाले. गणेश ढोकळे यांना जास्त मार असल्याने अधिक उपचारासाठी घाटी दवाखान्यात त्यांना पाठवण्यात आले.
याप्रकरणी तुळशिराम शिवाजी ढोकळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 1) ज्ञानेश्वर थोटे 2) लहु थोटे 3) भागवत थोटे यांच्यावर पाचोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe