छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत !

छत्रपती संभाजीनगर दि.२५ – सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेशासाठी उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश अर्ज सादर केल्यापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य संजय दाणे यांनी दिली आहे.

प्रवेश अर्ज सादर केल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत संबंढित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून तसे न केल्यास उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्यास संबंधित उमेदवार जबाबदार राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधितांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.

या ऑनलाईन अर्जाची हार्डकॉपी आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती व शपथपत्रे जोडून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपूरा, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करावे. दाखल केलेल्या प्रकरणाची पोहोच पावती प्रवेशासाठी वापरावी,असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!