सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्यास गुन्हा दाखल करण्याचे SP मनिष कलवानिया यांचे आदेश ! सायबर टिमचे सर्व सोशल मीडियावर बारकाईने लक्ष !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – आपल्या गावात / मोहल्यात धार्मिक तेढ निर्माण होईल अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे आलेले मेसेज, व्हिडीओ, अॅडीओ यांची खात्री करा संशयास्पद किंवा प्रक्षोभक वाटल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांना माहीती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पोस्ट करणे, फॉरवर्ड करणे यावर पोलिसांची टीम बारकाईने नजर ठेऊन आहे. धार्मिक तेढ निर्माण करणार्या समाजकंटकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक व्हिडियोद्वारे संदेश प्रसारित केला आहे. यात म्हटले आहे की, जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचे व्हिडीओ, संदेश, विनाकारण व्हायरल करून जाणीवपूर्वक अशी अफवा पसरवत असल्याचे आढळून आल्यास त्याचे विरुध्द कलम 153, 153 ( अ ), 295 (अ ) भादंवी कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येवून अशा व्यक्तींना कठोर कायदेशिर कारवाईला सामोर जावे लागणार आहे.
पालकांनी व गावातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या तरुण मुलांवर लक्ष ठेवावे जेणे करून त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा सामाजिक सौहार्द बिघडेल अशी कृती होणार नाही किंवा सोशल मीडियाचे माध्यमांतून आक्षेपार्ह मजकुर प्रसारित होणार नाही.
तसेच विद्यार्थ्यांनी सुध्दा सोशल मीडियाचा वापर करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारच्या कोणत्याही सोशल मीडियावरिल पोस्टला स्टेटला ठेवू नये किंवा पुढे फॉरवर्ड करू नये. अशा प्रकारची कृती त्यांच्याकडून झाल्यास त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल होवून चारित्र्य प्रमाणपत्रावर गुन्हयाची नोंद झाल्याने भविष्यातील चांगल्या नौकरी अथवा व्यवसायाच्या संधीस त्यांना मुकावे लागते. पोलीस सर्व परिस्थीतीला हाताळण्यास सक्षम असून सायबर पोलीस टिम ही तंत्रज्ञान व विशेष टुलच्या साहय्याने सर्व प्रकारच्या सोशल मीडिया साईडवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांची सोशल मीडिया पेट्रालिंग नियमत सुरु असते.
जुने विवादीत बाबीचा काही असामाजिक तत्व हे फायदा घेवून सोशल मीडियाच्या माध्यमांतून निराधार व खोटी अफवा पसरवून जाती जातीत तसेच दोन धर्मांत तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजकंटकाद्वारे विविध मार्गाचा अवलंब करण्यात येवुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे दृष्टीने सामाजिक व भावनिक गोष्टीला साद घालुन निष्पाप तरूणाईच्या डोक्यात इतराबाबत द्वेष निर्माण करण्यात येतो. यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे जेणे करून त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा समाजमन दुखावले जातील अशा आशयाचे मत कोणत्याही सोशल मीडियातून दिले जाणार नाही यांची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यामुळे सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नये अगर फॉरवर्ड करू नये, तसेच कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा. घायी घायीने प्रतिउत्तर देताना अपशब्दांचा वापर झाल्यास हा सुध्दा अपराध आहे. कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने बुध्दिपुरस्सर व दृष्ट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी अगर चिन्हाद्वारे तसेच दृश्य देखाव्याद्वारे (Visible Representation) त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करणा-या व्यक्तीला नमुद कलमा नुसार 3 वर्षा पर्यंत कारावास व दंड शिक्षा होवू शकते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe