विद्यार्थ्यांना पदवीसोबत ऑनलाईन कोर्सेसे करता येणार, आय लाईक कोर्सेसे चालू शैक्षणिक वर्षांपासून उपलब्ध !
महाराष्ट्र ज्ञान महामंडळा समवेत या संदर्भात सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर, दि.२९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीसोबतच आता ’आय लाईक’ कोर्सेस करता येणार आहेत. महाराष्ट्र ज्ञान महामंडळा समवेत या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला असून याची २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षापासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या दोन्ही संस्थामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या सदंर्भात मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात सोमवारी (दि.२०) ही बैठक झाली. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ, डॉ.बीना हुंबे, डॉ.वैशाली खापर्डे, परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक बीना कामत, वरिष्ठ महा व्यवस्थापक रेवती नामजोशी, विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, जिल्हा समन्वयक सिध्दार्थ पाटील, समन्वयक गजानन कुलथे, समन्वयक शेख इलियास यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर व ’एमकेसीएल’च्यावतीने बिना कामत यांनी करारावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची ’आय लाईक’ अर्थात ’इन्व्रेâडेबल लर्निंग इनोव्हेशन्स फॉर नॉलेज एम्पॉवरमेंट’ ही ऑनलाईन कोर्सेसची बास्केट तयार केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा सोबत ’नॉलेज पार्टनर’ म्हणून ’एमकेसीएल’ काम करणार आहे. या अंतर्गत व्यवसायभिमूख ओपन-इलेक्टिव्हि व व्äवâालिटी एन्हान्समेंट असा तीन गटातील हे अभ्यासक्रम आहेत.
दोन ते चार व्रेâडिटचे सदर कोर्सेस असून ते पदवीलाचा भाग असणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुरुप अशी या अभ्यासक्रमाची स्थापना करण्यात आली आहे, असे रवतीr नामजोशी यांनी सांगितले. आजपर्यंत १६० महाविद्यालयानी सदर कोर्स सुरु करण्यातबाबत आमच्याकडे स्वारस्य दाखविले आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी आर्थिक संख्येने वर्गात उपस्थित रहावे, त्यांना तांत्रिक ज्ञान मिळावे व रोजगार, स्वयंरोजगार मिळावा या साठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी सांगितले.
सदर ऑनलाईन अभ्यासक्रमांची रचना ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या नुसार आखलेले आहेत. तर ’नॅशनल व्रेâडिट प्रेâमवर्वâ’ अंतर्गत सुमार २०४ ’आय-लाईक’ कोर्सेसची रचना करण्यात आली आहे. तसेच हे सर्व अभ्यासक्रम अधुनिक तंत्रज्ञान, मार्केट, जॉब सेल्स व आंतरराष्ट्रीय मानकांच्या दर्जाचे अभ्यासक्रम आहेत. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्यावतीने हे सर्व अभ्यासक्रम ’कॉम्प्युटर लॅब-बेस्ड इन्लर्निंग मोड’ द्वारे राबविण्यात येतील. तसेच लर्निंग, असेसमेंट अॅण्ड इव्हूल्यूशेन मॅनेजमेंट सिस्टीम (इरा) या प्रक्रियेद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांची अधिक माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe