महाराष्ट्रराजकारण
Trending

Big Breaking: सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचे कान टोचले, मीडियाशी कमी बोला अन् काम लवकर करा ! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोर्टाची स्पष्ट नाराजी, ३० तारखेला सुधारीत वेळापत्रक सादर करण्याचे आदेश !!

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट नाराजी,

नवी दिल्ली, दि. १७ – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या संत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर नाराजी व्यक्त केली. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणी यापूर्वी दाखल केलेले वेळापत्रक अमान्य करत सुधारीत वेळापत्रक ३० ऑक्टोबर पर्यंत दाखल करा अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करून वेळापत्रक लादायला भाग पाडू नका, अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावलं. याचबरोबर मीडियाशी कमी बोला आणि काम लवकर करा, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना दिला.

शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याची याचिका उद्धव ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. याशिवाय शरद पवार गटाची याचिकाही यात क्लब केली असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज एकत्रीत सुनावणी घेतली. उद्धव ठाकरे व पवार गटाचे वकील कपील सिब्बल यांनी युक्तीवाद केला की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी प्रकरणात वेळकाढू पणाची भूमीका घेत आहेत. या प्रकरणात सर्व कागदत्रे दाखल करूनही यावर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विनाकारण मुद्दामहून विलंब लावत असल्याचा युक्तीवाद ठाकरे व पवार गटाकडून कपील सिब्बल यांनी केला.

यावर विधानसभा अध्यक्षांचे वकील तुशार मेहता म्हणाले की, मी अध्यक्ष राहुल नार्वेकरांबरोबर बसतो आणि एक वेळापत्रक ठरवतो. त्यावर सर्वोच्च न्यायलय म्हणाले की, आम्ही तुम्हाला एक शेवटची संधी देतो. दसर्याच्या सुट्टीत तुम्ही आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बसा आणि ३० ऑक्टोंबर रोजी परत आमच्याकडे सुधारीत वेळापत्रक घेऊन या. आणि जर ते वेळापत्रक आम्हाला मान्य असेल तर ठिक आहे नाहीतर आम्ही हस्तक्षेप करून वेळापत्रक देवू. त्यामुळे या प्रकरणात आता पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने असाही सल्ला दिला की, त्यांनी मीडियाशी कमी बोलावं आणि काम लवकर करावं

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वकील तुशार मेहता यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले की, आम्ही यापूर्वीच वेळापत्रक दाखल केलेलं आहे. त्यावर विधानसभा अध्यक्षांच्या यापूर्वीच्या वेळापत्रकावर सर्वोच्च न्यायलयने असमाधन व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, या प्रकरणात खूप उशीर होत आहे. मी तुम्हाला एक शेवटची संधी देतो. दसर्याच्या सुट्टीत विधानसभा अध्यक्षांबरोबर बसून सुधारित वेळापत्रक तयार करा. जर तुम्ही सुधारीत वेळापत्रक नाही केलं किंवा व्यवस्थित वेळापत्रक नाही दिलं तर सर्वोच्च न्यायालय वेळापत्रक ठरवून देणार. एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दाखल केलेल्या वेळापत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना म्हटले की, खूप उशीर झाला आहे. आम्हाला हे वेळापत्रक मान्य नाही. तुम्ही सुधारीत वेळापत्रक लवकर द्या. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वकील तुशार मेहता म्हणाले की, मला विधानसभा अध्यक्ष यांच्याबरोबर बसु द्या, नवीन वेळापत्रकासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करू द्या त्यानंतर सुधारीत वेळापत्रक सादर करू, असा युक्तीवाद विधानसभा अध्यक्षांच्या वकीलानी केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एक शेवटची संधी त्यांना दिली असून पुढील तारीक ३० ऑक्टोबर ठेवण्यात आहे. वेळापत्रक आम्हाला लादायची वेळ आणू नका, असेही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना स्पष्ट शब्दात बजावले.

याआधी १३ ऑक्टोंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले होते…

नवी दिल्ली, दि. १३ – शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रसमधील उभ्या फुटीचे प्रकरण तथा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीस होते. सर्वोच्या न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढले. अध्यक्षांचं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही, असं म्हणत सरन्यायाधीश विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रचंड नाराज झाले. विधानसभा अध्यक्ष वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांना जबाबदार धरावं लागेल अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचे वाभाडे काढले.

पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेला घटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये वेळापत्रक निश्चित करण्यास सांगितले. विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी उद्धव ठाकरे गटाचे सदस्य सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सभापतींनी किमान पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी या विषयावर निर्णय घ्यावा, निर्णय घेण्यास विलंब होता कामा नये.

अपात्रतेची याचिका प्रलंबित ठेवल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांवर सर्वोच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले आणि सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करण्यास सांगितले. उद्धव गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अधिवक्ता डॉ. अभिषेक मनु सिंघवी जोरदार युक्तीवाद केला.  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकांवर लवकर निर्णय घेण्याच्या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना सल्ला द्यायला पाहिजे. ते सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारू शकत नाही. ते कोणत्या प्रकारचे वेळापत्रक सेट करत आहे? जूनपासून या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. दिखावा होऊ शकत नाही. यावर सुनावणी झाली पाहिजे.” दहाव्या अनुसूची अंतर्गत अधिकार वापरणारे अध्यक्ष आहेत, असे सांगून न्यायाधिकरणाच्या दैनंदिन कामकाजात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकते का, असा सवाल उपस्थित करून CJI म्हणाले की न्यायाधिकरण म्हणून स्पीकर सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राला उत्तरदायी आहे. “आम्ही 14 जुलै रोजी नोटीस जारी केली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आम्ही आदेश पारित केला. आता अध्यक्षांनी कोणतेही पाऊल उचलले नाही हे पाहता, त्यांनी 2 महिन्यांत निर्णय द्यावा, असे आम्ही म्हणण्यास बांधील आहोत,” अशी टिपणी सरन्यायाधीशांनी केली.

शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टाने अध्यक्षांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यावर आक्षेप घेतला. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतरही अध्यक्षांनी कोणत्याही निर्णयाला विलंब करत असतील तर न्यायालय त्यांना जबाबदार धरू शकते, असा पुनरुच्चार कोर्टाने केला.

सरन्यायाधीश म्हणाले, “पुढील निवडणुकांपूर्वी निर्णय घेतला गेला पाहिजे आणि त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया निष्फळ होऊ शकत नाही.” सीजेआयने रोहतगी यांना विचारले की, त्यांचे अशिला अध्यक्षाच्या निर्णयाला का घाबरतात. अखेर कोर्टाने सुनावणीचे वेळापत्रक अध्यक्षांना सांगण्यास सांगून पुढील मंगळवारपर्यंत म्हणजे १७ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब केली. “जर आम्हाला वाजवी वेळापत्रक निश्चित केले गेले असे वाटत नसेल, तर आम्ही वेळ मर्यादा निश्चित करणारा अनिवार्य आदेश पारित करू,” असेही न्यायालयाने आदेश दिले.

सीजेआयने अधोरेखित केले की “मला न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्याची काळजी आहे, यापूर्वी, कोर्टाने म्हटले होते की, आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या एकूण चौतीस याचिका प्रलंबित आहेत. शिवसेनेच्या प्रकरणासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरद पवार गटाचे सदस्य जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या विरोधात दाखल केलेल्या रिट याचिका देखील अध्यक्षांद्वारे जलद निर्णयासाठी सूचीबद्ध आहेत. या दोन्ही बाबींवर पुढील मंगळवारी विचार केला जाईल, असे कोर्टाने सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!