झेडपी
Trending

शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून घ्या, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ! टपाल कामामुळे राज्यातील शिक्षक त्रस्त !!

आदर्श शिक्षक समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ :- शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून घ्या, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा आदर्श शिक्षक समितीने दिला आहे. सप्टेंबरमध्ये आदर्श शिक्षक समिती राज्य शाखेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय समोर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येईल. यासंदर्भात समितीने निवेदनाच्या माध्यमातून अशैक्षणिक कामांबद्दल रोष व्यक्त करून शासन-प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे.

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन सादर केले असून निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, मनपा व नपा) शाळेत राज्यभरात हजरो शिक्षक पदे रिक्त आहेत. याचबरोबर विविध जिल्ह्यांतील पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदे देखील रिक्त असल्याने आहे. त्या परिस्थितीत कार्यरत शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत असताना सातत्याने शिक्षकांना जिल्हा स्तरावर महसूल विभागाकडून बी एल ओ सारखे अशैक्षणिक काम करायला लावत आहे तर दुसरीकडे आता नवभारत साक्षरता अभियान राबविण्यात यावे अशी सक्ती करण्यात येत आहेत.

या व्यतिरिक्त शिक्षकांना विविध योजना व उपक्रम राबविण्यात यावे असे शिक्षण विभागाच्या वतीने सुरू आहे. ऑनलाईन टपाल कामे यांनी सर्वजण त्रस्त आहे. याचा प्रचंड प्रमाणात विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीवर होत असून शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी वेळच मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान सुरू आहे. राज्यभरात शिक्षक अशैक्षणिक कामामुळे व टपाल कामामुळे त्रस्त झाले असून आपण स्वतः लक्ष वेधून संबधित विभागाला निर्देश देऊन राज्यातील शिक्षकांकडील अशैक्षणिक सर्व कामे काढून घ्यावीत.

अवाजवी टपाल कामे व उपक्रम कमी करावे सदर सर्व कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी ही विनंती नवभारत साक्षरता सर्वेक्षण व बी एल ओ सह सर्व अन्य अशैक्षणिक ऑन लाईन टपाल कामे शिक्षकांकडून काढून न घेतल्यास सप्टेंबरमध्ये आदर्श शिक्षक समिती राज्य शाखेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय समोर राज्य सरकारचे लक्षवेधण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदर्श समितीचे राज्याचे अध्यक्ष शिवाजीराव साखरे, अंकुश काळे, रामदास सांगळे ,अंजुम पठाण, रवींद्र अंभोरे, अनिल मुलकलवार, रामकीसन लटपटे, गिरीश नाईकडे, चंदू घोडके, राजेंद्र नवले, बाळासाहेब महाडिक, शरद पाटील , भीमाशंकर जमादार, उत्तम पवार, संतोष माठे, जगत घुगे, संतोष बरबंडे, संजीव देवरे आदीने दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!