महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न तातडीने सोडवा ! अजितदादांनी सभागृह दणाणून सोडले !!

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न तातडीने सोडवा – अजित पवार

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी – वेतनश्रेणी दर्जा व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज या प्रश्नावर आज सभागृहात आवाज उठवला.

राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी अधिवेशनावेळी आंदोलन केले होते. त्यावेळी दिनांक २६ जानेवारीपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र अजूनही त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. कोरोना काळात चांगले काम केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करुन त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची आग्रही मागणी अजित पवार यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!