तलाठी व कोतवाल लाच घेताना पकडले ! पिशोर, कन्नड तालुक्यातील शेतीचा फेर घेण्यासाठी घेतले ३० हजार !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – शेत जमीनीच्या फेरफार नोंदीसाठी ३० हजारांची लाच घेताना तलाठी व कोतवाल यांना पकडण्यात आले. कन्नड तालुक्यातील शेतजमीनीच्या फेरफारसाठी ही लाच घेतली. छत्रपती संभाजीनगर व जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
दीपाली योगेश बागुल (वय 32 वर्षे, व्यवसाय- तलाठी सजा भारंबा. मौ.पिशोर,ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर) , शेख हारुन शेख छोटु वय (41 वर्षे, कोतवाल मौ.पिशोर, ता.कन्नड ) अशी आरोपींची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांची मौजे भारंबा शिवारातील वडीलोपर्जित जमीन आहे. तक्रारदार व इतर दोघां भावांचे नावे फेरफार नोंद करण्यासाठी पंचासंमक्ष 30,000/- लाचेची मागणी करुन स्वीकारले असतांना आरोपींना पकडण्यात आले. 22/02/2023 रोजी लाचमागणी पडताळणी झाली तर 09/03/2023 रोजी लाच घेताना पकडण्यात आले.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, सुदाम पाचोरकर, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि.जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी: एस.एस.शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना, सापळा पथक :- पोलीस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गणेश बुजाडे, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे सर्व ला.प्र.वि, जालना यांनी केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe