महाराष्ट्र
Trending

सहाय्यक पोलिस उप निरीक्षकाचे घर फोडले ! जालन्यात चोरट्यांचा सुळसुळाट !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – जालन्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून चोरट्यांनी चक्क सहाय्यक पोलिस उप निरीक्षकाचे घर फोडले. चौधरीनगर येथील घरात चोरी करून चोरट्यांनी ६४ हजारांचा ऐवज लंपास केला.

सपोउनि रविंद्र सखराम चव्हाण (वय 40वर्षे व्यवसाय- नौकरी सपोउनि, रा. चौधरीनगर ता. जि. जालना) हे जालना पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षक म्हणून गेल्या दीड वर्षापासून ते नेमणुकीस आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सपोउनि रविंद्र सखराम चव्हाण यांनी चौधरीनगर येथे किरायाने घर घेतले आहे. त्यांचे जुने घर शंकर जिन येथे असल्याने ते अधूनमधून जुन्या घरी जात असतात.

दि. 22/06/2023 रोजी दुपारी 04:00वाजेच्या सुमारास सपोउनि रविंद्र सखराम चव्हाण हे जुन्या घरी शंकर जिन येथे गेले होते. आज दि. 27/05/2023रोजी सकाळी 05:45वाजेच्या सुमारास त्यांना एस. आर. पी. एफ ग्रुप-3 येथून फोन आला की, चौधरी नगर येथे राहत असलेल्या किरायाचे घर उघडे असल्याचे दिसून येत आहे.

ही माहिती मिळताच सपोउनि रविंद्र सखराम चव्हाण व त्यांचे भाऊ 06:05 वाजेच्या सुमारास जावून पाहिले. तेंव्हा किरायाच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात जावून पाहिले असता. घरातील दोन मोबाईल फोन व एक सोम्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे दिसले. एकूण 64,000/- रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

सपोउनि रविंद्र सखराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!